Tuesday, 13 October 2015

नवरात्री - नऊ दिवसांचे महात्म्य - दिवस पहिला


आपल्या सर्वांना नवरात्राची कथा काय हे आपल्या आईवडिलांनी सांगितले, ते असे की रामाच्या हातून रावणाचा वध व्हावा, या उद्देशाने नारदमुनींनी रामाला नवरात्रीचे व्रत करायला सांगितले. नंतर हे व्रत पूर्ण केल्यावर रामाने लंकेवर स्वारी करून शेवटी रावणाला ठार मारले. अजून एक कथा सांगितली जाते ती अशी की देव आणि दानवांमध्ये युद्ध चालू होते आणि काही केल्या देव, दानवांचा पराभव करू शकत नव्हते. तेंव्हा सर्व देवानी देवीला आवाहन केले व देवीचा विजय व्हावा म्हणून देव अनुष्ठानाला बसले. महिषासुर नावाच्या असुराशी प्रतिपदा ते नवमी असे नऊ दिवस युद्ध करून देवीने नवमीला रात्री असुराला मारले.(तेव्हापासून तिला महिषासुरमर्दिनी म्हणू लागले).
प्रत्येक घरी शास्त्रानुसार घटस्थापना केली जाते व दीप अखंड तेवत ठेवला जातो. या दिवसापासून संत-महंतांच्या योग साधनेला सुरवात होते.
कथेमधून आपण असा बोध घेऊ शकतो की देव आणी दानव हे symbolic आहेत. जश्या बाहेर चांगल्या आणि दृष्ट प्रवृत्ती आहेत तश्याच आपल्या आतही चांगले आणिवाईट गुण आहेत. नेहमी चांगल्या व दृष्ट प्रवृत्ती यांचा लढा चालू असतो. जसे देवानी देवीला पाचारण केले तसेच आपण आपल्या आतल्या देवीला(शक्तीला) पाचारण करायचे आहे. आपणच आपल्या वाईट गुणांवर विजय मिळवायचा आहे. सगळ्यात मोठा असुर महिषासुर (म्हणजे आळस) त्याला मारायला शक्तीला आळवायचे आहे. नवरात्रामध्ये शारीरिक, वाचीक, मानसिक शुद्धीसाठी वेगवेगळे नेम केले जातात.( ते का करायचे आणी बरेच काही पुढच्या ९ दिवसात आपण पाहू ). त्याप्रमाणे मी सुद्धा नवरात्रीतील दिवसाप्रमाणे माहिती लिहायचा व मंडला काढायचा नेम केला आहे.

दिवस पहिला

पहिली आदिशक्ती: 'शैलपुत्री' (पर्वतराज हिमालयाची मुलगी)
रूप: या दुर्गेच्या उजव्या हातात त्रिशूळ आणि डाव्या हाता कमळाचे फूल आहे
वाहन : नंदी
देवी: श्री दुर्गादेवी
देवीचे तत्व: पृथ्वी
रंग : लाल
तत्वाशी संबधित आकार: ३ पाकळ्या
साधना: मन 'मूलाधार' चक्रात स्थिर करतात 
मंत्र : 
वंदे वाद्द्रिछतलाभाय चंद्रार्धकृतशेखराम |
वृषारूढां शूलधरां शैलपुत्री यशस्विनीम्‌ ||







नवरात्रीमधील दिवसाचा रंग व तत्वाशी संबधित आकार हे घेऊन मंडला काढला आहे.

Monday, 25 May 2015

सद्गुरुप्राप्ती

सद्गुरुप्राप्ती म्हणजे पूर्वसुकृताचे फळ
सद्गुरुप्राप्ती म्हणजे कार्यसिद्धीचे बळ||

सद्गुरुप्राप्ती म्हणजे मातेचा प्रेमळ ओलावा
सद्गुरुप्राप्ती म्हणजे चित्तशुद्धीचा ठेवा ||

सद्गुरुप्राप्ती म्हणजे जीवनाची सार्थकता
सद्गुरुप्राप्ती ने संपेल ज्ञानाची व्याकुळता ||

सद्गुरुप्राप्ती ने येते स्व-स्वरुपाची प्रचीती
सद्गुरुप्राप्ती ने होते दिव्य आध्यात्मिक जागृती ||

सद्गुरुप्राप्ती म्हणजे अक्षय आनंदाचा ठेवा
सद्गुरुप्राप्ती म्हणजे सायुज्यमुक्ती सकल जीवा ||


Tuesday, 17 March 2015

Use and throw

लेखाच्या नावावारुनंच माझा रोख कुठे आहे हे तुमच्या नक्कीच लक्षात आले असेल. हा लेख साधारण वय वर्षे ३५-५० मधील लोक जास्ती रिलेट करू शकतील. कारण ह्या लोकांनी आपल्या आई-बाबांची पिढी ही जवळून पहिली आहे आणी पुढची पिढीही. ह्या दोहोंच्या विचारसरणी मध्ये आणी वस्तू वापरण्याच्या पद्धतीमध्ये खूपच फरक आहे.
आई-बाबांच्या पिढी मध्ये कुठलीही वस्तू मग ती scooter/cycle/car/fridge/TV/phone  अगदी cooker/gas ह्या वस्तू एकदा का घरी आल्या त्या कायमच्या राहायच्या. काही जर बिघाड झालाच तर लगेच दुरुस्ती करून परत वापरल्या जायच्या. कारण वस्तू निर्जीव असल्या तरी त्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन सजीव असायचा. त्या प्रत्येक वस्तूबरोबर काहीतरी आठवण जोडली गेलेली असायची. वाढदिवस / भाऊबीज / पाडवा / बढती ह्या अश्या वेगवेगळ्या निमित्याने घेतल्या गेल्यामुळे त्या निर्जीव वस्तूंना हि अस्तित्व होते. त्यामुळे त्यांची जीवापाड काळजी घेतली जायची. त्या वेळच्या वस्तूही दणकट असायच्या. आजोबांनी वापरलेली सायकल नातवापर्यंत म्हणजे जवळजवळ ५०-६० वर्षे वापरली जायची. थोड्या फार फरकाने हीच गोष्ट सगळ्या वस्तूंची. दुरुस्तीचा खर्चही किरकोळ असायचा त्यामुळे डागडुजी करून वस्तू पिढ्यानपिढ्या वापरल्या जायच्या. प्रत्येक गोष्ट खरेदी करताना त्याच्या उपयुक्ततेचा आणी किमतीचा विचार केला जायचा.
GenNext चे आयुष्य पाहता वस्तू वापरायच्या आणी फेकून द्यायच्या. दुरुस्तीची भानगड नाही. Use and Throw चा जमाना आलाय असे वाटते. याची कारणे अशी असू शकतील - पैशाची सुबत्ता आलीय, वस्तू तकलादू आहेत / वस्तूंची variety and availability आहे. काही वेळेला वापरायचा कंटाळा आला म्हणून हेही कारण असते. TV/ Fridge/ Cars सुद्धा लोक ७-८ वर्षांनी बदलतात. कपडे, चपला तर काही विचारूच नका. आजची पिढी उपयुक्ततेचा आणी किमतीचा विचार न करता फक्त आवडीचा विचार करते , जी बहुतेक वेळा क्षणिक असते.
आपण ह्या २ पिढ्यांचा दुवा - मधली पिढी - दोघांच्या कात्रीत सापडलेली. सगळ्यांचे बरोबर आहे असे वाटणारी पिढी. आपल्या आईवडिलांनी आपल्यापुढे कधीच पैशाचा हिशोब मांडला नाही व मर्यादाही सांगितल्या नाहीत पण त्या आपल्यापर्यंत नेहमी पोचल्या. आईवडिलांचा संसार उभारताना पाहिलेली पिढी त्यामुळे प्रत्येक वस्तूशी आपलीही attachment पण समृद्धी आल्यामुळे मुलांचे हट्ट हि पुरवायला लागलो आणी त्यांचेही logic पटायला लागले. मुलानाही ते अगदी सहज मिळाल्यामुळे त्याची किंमत वाटत नाही. भरपूर पैसे मिळवायचे आणी भरपूर खर्च करायचे हे जीवनाचे सूत्र झालेय. परमेश्वराजवळ एकच प्रार्थना आहे की हि नवी पिढीची वापरणे आणी फेकून देण्याची वृत्ती वस्तू पुरती मर्यादित राहो नातेसंबध मध्ये न येवो.

(खरतर हा विषय प्रचंड मोठा आहे. हि पोस्ट लिहिण्या मागचा उद्देश्य फक्त use and throw हा विचार मांडण्याचा आहे. तुम्ही तुमचे विचार जरूर कळवा.)

Thursday, 1 January 2015

My new oil painting - new hobby
I wish all viewers of this blog HAPPY NEW YEAR 2015
May this year brings you happiness, health, piece of mind.


Monday, 1 December 2014

||विठ्ठल विठ्ठल||

Inspiration: तुकाराम महाराजांचा बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल अभंग

बोलावा विठ्ठल | पहावा विठ्ठल|
वाचावा विठ्ठल| रोजदिशी ||१||
ऐकावा विठ्ठल| करावा विठ्ठल|
स्मरावा विठ्ठल| क्षणोक्षणी ||२||
पहावे नाटक | चालले जगाचे|
धरावे विठ्ठलाचे | बोट घट्ट ||३||
पुसूनिया काजळी | अज्ञानाची काळी|
भरावा विठ्ठल| अंतःकरणात ||४||
टाकुनिया मोह| विषय वासना|
उरावा विठ्ठल| अंतर्बाह्य||५||
साध्य विठ्ठल| साधन विठ्ठल|
साधक विठ्ठल| होऊन जावे||६||

Thursday, 20 November 2014

न-मन

नाम हाच नेम | नाम हेच व्यवधान |
नाम हेच साध्य | नाम हेच साधन||१||

नाम-रूप असे भिन्न | नामातून रूप होतसे उत्पन्न|
रूप असो वा नसो| नाम असे चिरंतन||२||

नाम हीच एक कृती | नाम हीच असे भक्ती|
नामातच सद्संगती | नामानेच शक्य होईल मुक्ती||३||

नाम म्हणजे अखंड अनुसंधान | कर भगवंताच्या स्वाधीन मन |
ऐसे भगवंताचे आश्वासन | मन मग होईल 'न-मन '||४||

अखंड चालो नामघोष| नामाग्नी जाळेल पाप-दोष |
नामानेच मिळेल भगवंत प्रत्यक्ष| मुखी नाम हाती मोक्ष||५||

Monday, 27 October 2014

नादब्रम्ह

सप्तसूर संगीताचे
झंकारले स्वर संवादिनीचे
आरोह- अवरोह अलंकार रागांचे
सुर- लय -ताल बहरती गाण्याचे
साकारले मग गीत मनाचे
हेच असे साध्य साधनेचे
साधनेतून नादब्रह्म साकारायचे
नादब्रह्म हे ओजस्वी ओंकाराचे
ज्योतिर्मय ब्रम्ह  तून गाठायाचे
अन स्वतःच नादब्रम्ह होउन जायचे

Wednesday, 24 September 2014

सृजनाचा आनंद


गेले जवळजवळ दोन महिने मी ब्लोगवर नवीन पोस्ट टाकली नाही त्यामुळे मैत्रिणींची विचारपूस चालू  झाली की काय ग तुझे ब्लोग चे भूत उतरले की काय? काय सध्या कशात एवढी बिझी आहेस? काय मोठे प्रोजेक्ट चालू झालेले दिसतेय? अग आम्ही वाट पाहतोय लिही काहीतरी.......
तुमच्या सगळ्यांचे आभार......I think this is what keep me going :)
तर नमनाला घडाभर तेल झाले......
तर गेले २-३ महिने मी  Zentangle art शिकत होते किंवा करून पहात होते. ( हा माझा सगुण की दुर्गुण माहित नाही पण कशात घुसले की मुळापर्यंत जायचे हा स्वभाव) त्यातून हि ZenT आर्ट जमली व खूप इंटरेस्ट वाढला त्यामुळे आधी 8 cm x 8cm करता करता A3 size पर्यंत बरीच चित्रे काढून झाली. मग विचार आला असे aimlessly  न करता काहीतरी गोल असायला हवा.
So I put goal in front of me - Exhibition Cum Sale
हो मी जरा जास्तच मोठ्ठी उडी घ्यायचे ठरवले. माझ्यासारख्या hardcore Engineer नी जिचा तसा शाळा सोडल्यापासून फार आर्ट शी संबंध आला नाही किंवा जिला उपजत कलाकार म्हणता येणार नाही असे नसताना एकदम Exhibition प्लान करायचे म्हणजे it was really BIIIG challange!!!
मला वाटतेय कुठलेही Exhibition करताना बऱ्याच गोष्टींचा विचार करावा लागतो
१. तुम्हाला काय आवडते ह्यापेक्षा लोकांना काय आवडेल
२. काहीतरी नाविन्य हवे
३. आर्ट appreciate बरेचदा केली जाते ती सेल करण्याच्या दृष्टीने विचार
४. Packing
५. Advertising / Marketing / Displaying/ Venue/ Selling
माझ्या दृष्टीने पाचवा मुद्दा दुय्यम असला तरी त्याचाही विचार करणे गरजेचे होते.
ह्या Art form चा विचार केला तर typical Zentangle piece is black n white, abstract and its on 3x3 inch tile. ह्या गोष्टी विचारात घेता मग मी Zentangle patterns वापरून काय काय करता येईल हा विचार सुरु केला. तेंव्हा वाचताना कळले की हे patterns वापरून तुम्ही जे काही करता त्याला Zia - Zentangle Inspired Art म्हणतात.  मग मीही ह्यावरच लक्ष्य द्यायचे ठरवले. ते ठरल्यावर मग फक्त पेपर वर सीमित न ठेवता बाकी कुठल्या surface वर करता येईल ह्यावर reserch आणी Experiments चालू केले. मग कॅनवास, वूड, सिरामिक, प्लास्टिक, ग्लास, बीड्स, मोती असे वेगवेगळे प्रयोग केले. तेंव्हा लक्षात आले की paper drawing काढून फ्रेम केले की Art piece तयार झाला पण बाकी कुठल्याही surface वर केले असता पुढे बऱ्याच processes चा विचार व अभ्यास करावा लागेल.      
   

हा artform micron टीप pen ने काढायचा असल्यामुळे कॅनवास चा option out झाला. Ceramic was big challenge because of curved surface. pen ला grip यायची नाही, lines बरोबर यायच्या नाहीत त्यामुळे त्यासाठी वेगळी designs choose करावी लागली. सिरामिक वर designs काढल्यानंतर ती waterproof बनवण्यासाठी ती ओवेन बेक करावी लागली. ग्लास चे हि तेच. पण वूड तर कसे बेक करणार म्हणून मग sealent शोधावे लागले. मग transperent, वास न येणारा sealent शोध मोहीम चालू झाली. हा प्रवास जरी एक paragraph मध्ये लिहून झाला असला तरी त्यासाठी बरीच वणवण करावी लागली. वूड च्या बाबतीत ply च्या दुकानात गेल्यावर येवढा छोटा पीस हि बाई मागतेय म्हटल्यावर ती माणसे विचित्र पहायची, त्यात त्यांची भाषा किती mm किती इंच हे मला बापडीला कळायचे नाही. carpenter कडून पाहिजे तसे cut करण्यासाठी त्याला बाबापुता करावा लागला. पण हळूहळू जमले ते.

Earrings- my other passion त्यातही Zia चा वापर व्हावा हि इच्छ्या त्यामुळे मग परत experiments....ह्यासाठी बरेच failed experiments झाले. मग काय काय केले की फेल होते हे कळल्यावर मग काय केले हि बरोबर होईल हे कळले ( माझे trade secret  मी तुम्हाला सांगत नाहीय ते तुमच्या लक्षात येतेय का? ) तर असे करकरता बऱ्याच गोष्टी तयार झाल्या. मग framing, packing चालू झाले. मग point ५ च्या दृष्टीने विचार चालू झाला.
  

माझी मैत्रीण मंजुषा हिच्या पुढाकाराने मी राहते त्याच complex मध्ये माझे पहिले वाहिले (maiden) exhibition करायचे ठरले.

Exhibition छानच पार पडले. १-२ लोक वगळता सर्वांसाठी हा प्रकार नवा होता. त्यामुळे त्यांना सांगताना मजा आली. बरेच जणांना वाटले मी कुणाची चित्रे विकायला आणलीत. कुणाला हि pen नी काढली आहेत ह्यावर विश्वास बसेना. अगदी अनोळखी माणसांकडून " wow", "Intricate", "awesome"," amazing", "different", "surprise" अशी विशेषणे ऐकताना २-३ महिन्याच्या मेहनतीचे चीज झाल्यासारखे वाटले.
 


 








Getting very good response and making good sale was cherry on the cake.
ह्यातील प्रत्येल गोष्ट करतानाचा आनंद दरवेळी वेगळा होता. मी प्रत्येकवेळी निर्मितीचा (creation) आनंद अनुभवला. आणी येवढेच सांगू शकेन की तो काही औरच होता.

Friday, 18 July 2014

Brain Yoga: Some more Zentangle drawings


Free Birds
Couple dance


Zentangle jewellery
Freehand


Ladies gang

Flower

Necklace design


3D tangling