Monday, 28 April 2014

झालासी भक्ताचा देव तू

बरेच महिन्यापूर्वी माझ्या वाचण्यात एक लेख आला. त्यात हे लिहिले होते

" Each one of us is potential Hanuman and can find ways of changing destiny with our mind-actions-words. We can face challenges with ease. When Hanuman is awakened within life is experianced as one illuminated stretch of being where there is unlimited strength, power and purpose."

मी हे जेंव्हापासून वाचले तेव्हापासून माझ्या मनात "हनुमान" हा विषय घोळत होता. मला हि कल्पना फार आवडली. आपण जेव्हा हनुमानाची प्रार्थना करतो तेव्हा आपणही आपल्या आतील उर्जा-शक्ती (हनुमान) जागे किंवा उद्दीपित करत असतो. खरतर हनुमान वानर कुळातजन्मला असल्यामुळे स्वतःला सामान्य समजत होता. त्याला त्याच्या सामर्थ्याची कल्पना नव्हती. पण जेव्हा त्याची श्रीरामाची भेट झाली तेंव्हा त्याला त्याच्या जीवनाचे उद्दिष्ट समजले. आपले मनही वानरासारखे निरर्थक उड्या मारीत असते. जेव्हा गुरूची भेट होते तेंव्हा आपल्याला आपल्या मनाच्या सामर्थ्याची जाणीव होते. रामाची भक्ती करता करता हनुमान इतका मोठा झाला की लोक त्याला देव म्हणून पूजू लागले.ह्याच संदर्भात मला सुचलेल्या काही ओळी..........

हे भगवंता हे हनुमंता
झालासी भक्ताचा देव तू ||

बुद्धिमत्तेचा सागर तू
चौदा कलांचा स्वामी तू
अष्टसिद्धी योगी तू ||१||

सामर्थ्याचा अविष्कार तू
महातपस्वी योद्धा तू
पराक्रमाची परिसीमा तू ||२||

रुद्रांचाही रुद्र तू
बलवंत असा योगी तू
असीम श्रद्धेचे भांडार तू ||३||

सूक्ष्माहुनी सूक्ष्म तू
ब्रम्हांडहूनी मोठा तू
मनापेक्षाही चपळ तू ||४||

आदर्श असा साधक तू
सेवा व शक्तीचे प्रतिक तू
रामभक्तीचा उच्चांक तू ||५||

हे भगवंता हे हनुमंता
झालासी भक्ताचा देव तू
एकच मागणे असे तुजपाशी
कर जागृत माझ्यातील हनुमंत तू
कर जागृत माझ्यातील हनुमंत तू||

Wednesday, 26 February 2014

अध्यात्माची सप्तपदी

चला जाऊ अध्यात्माच्या प्रवासाला
स्वतःच स्वतःच्या  संगतीला ||

पहिले पाऊल जिज्ञासेचे
स्वतःच स्वतःला शोधण्याचे
मुमुक्षु असे नाव त्याचे ||१||

दुसरे पाऊल ईच्छ्येचे
स्व-उन्नतीकरता कर्म करण्याचे
ज्ञान संपादन करण्याचे ||२||

तिसरे पाऊल श्रद्धेचे
हे असे अति महत्वाचे
जे घडते ते चांगले ह्या विश्वासाचे||३||

चौथे पाऊल शिस्तीचे
यम-नियम नित्य पाळण्याचे
साधना असे नाव त्याचे||४||

पाचवे पाऊल शरणागतीचे
अहंकार/अविनय गळून पडण्याचे
सर्वस्व भगवंताच्या पायी वाहण्याचे||५||

सहावे पाऊल अनुसंधानाचे
मन भगवंताच्या स्वाधीन करण्याचे
नित्यनियमाने साधण्याचे ||६||

सातवे पाऊल ध्यानाचे
आपोआप त्रिपुटी गळून पडण्याचे
सत-चित-आनंद होण्याचे ||७||

Monday, 24 February 2014

आई

फडक्यांच्या घरी सातवे कन्यारत्न जन्मले
लाडाचे शेंडेफळ माझी माय ती ||
भावासी माया लावी बहिणींनाही वात्सल्य देई
भाचारांची लाडकी मावशी माझी माय ती ||
आदर्श असे सून ती, आदर्श असे वहिनी
आदर्श अर्धांगिनी माझी माय ती ||
कुमारांची आशा ती, कुमारांची मनीषा ती
मंजिरी-स्वप्ना-धनश्री ची आदर्श माय ती ||

माय माझी सखी, माय माझी गुरू
माय माझी दैवत, मी तिचे पाखरू ||
तिच्या वेलीवरची कळी मी
तिच्या छ्बीची सावली मी
तिच्या गुणांचे प्रतिक मी
तिच्या संस्काराचे प्रतिबिंब मी
तिच्या शिस्तीचा परिपाक मी
तिच्या अस्मितेचा ताठ कणा मी
इतकी वर्षे असे ती वेगळी अन वेगळी मी
परंतु आता झालो आहे मीच ती अन तीच मी ||
असेल जर पुनर्जन्म कधी, आई तुझ्याच पोटी जन्मेन मी
आई तुझ्याच पोटी जन्मेन मी ||

Wednesday, 22 January 2014

रामायण

आपुलिया अंतरात रोज घडे रामायण
करे हरण मनरूपी सीतेचे, अहंकाररूपी रावण ||

रावण करी सितेभोवती षडरिपुंचे थैमान
असमर्थ असे सीता अन तिचे सुटकेचे प्रयत्न ||

रोज शोधी सीतेसी, विचाररूपी लक्ष्मण
पण व्यर्थ होतसे त्याची हि वणवण ||

मग येई कामी, श्वासरुपी हनुमान
सोडवी चंचल सीतेसी तो निग्रही हनुमान ||

साध योग जिंकूनी शरीर-इंद्रिय-मन
करुनी चित्त एकाग्र आणी प्राणापान समान ||
म्हणेल तथास्तु आत्माराम होऊनिया प्रसन्न
आपुल्या अंतरात रोज घडे रामायण ||

Sunday, 12 January 2014

कर्मरमणी

भगवंतानी जरी सांगितला मार्ग ज्ञान-कर्म-भक्तीचा |
सुरु कर प्रवास,  सोपा व सर्वश्रेष्ठ कर्माचा ||

सामान्य, योगी वा संन्यासी, न सुटे त्यासी कर्म |
ईश्वरभक्तीची ओल असता कर्माचे होईल अकर्म ||

कर कर्म लावूनी, शरीर-मनाचा मेळ |
तुझ्यासाठी होईल, जीवन एक खेळ ||

हर कर्मामध्ये ओत भाव-भावना-ओलावा
करुनी असे कर्म, मिळेल चित्तशुद्धीचा मेवा ||

टाकून कर्तृत्वाचा अहंकार व कर्मफलाची आसक्ती, होईल निष्काम कर्म |
हो कर्मरमणी, घे आनंद कर्माचा, हाची असे स्वधर्म ||

Sunday, 5 January 2014

To my Sisters....

नाते बहिणीबहिणींचे

नाते बहिणीबहिणींचे हे एक सोनेरी साज असते |
प्रेमाच्या राशीवरचे चक्रवाढ व्याज असते ||

नाते बहिणीबहिणींचे काहीसे अबोल असते
शब्दात व्यक्त होणे शक्य नाही पण सागराहून खोल असते ||

नाते बहिणीबहिणींचे हे थोडेसे हट्टी असते |
एका क्षणाला कट्टी तर दुसऱ्या क्षणाला गट्टी असते ||

नाते बहिणीबहिणींचे हे सुरेल गाणे असते |
कधी कोमल गंधार तर कधी शुद्ध निषाद असते ||

नाते बहिणीबहिणींचे आश्वासक मैत्रीचे असते |
कधी वात्सल्याची सोबत तर कधी मायेची ऊब असते ||

नाते बहिणीबहिणींचे आयुष्य सुंदर करते|
कितीही सहवासात असले तरी अजून हवेच असते
असेच नाते धनश्री-स्वप्नाचे, माझ्यासाठी अनमोल असते, माझ्यासाठी अनमोल असते......


Sunday, 15 December 2013

प्रवास मुक्तीचा

प्रवास जन्मोजन्मीचा,  असे जरी हर व्यक्तीचा |
तरीही असेल वेगवेगळा,  प्रवास मुक्तीचा ||

नरदेह असे अति दुर्मिळ, पुरुषार्थ साधावा बुद्धीचा |
स्वतःच कर तू उद्धार स्वतःचा, सुरु कर प्रवास मुक्तीचा ||

चंचल जरी मन तरी, कर अभ्यास योगाचा |
सोहं साधना करेल सोपी, प्रवास मुक्तीचा ||

भगवंतानी दिले आश्वासन, व्यर्थ न जाई अभ्यास विवेक वैराग्याचा |
ठेऊनी विश्वास त्यावर, चालू ठेव प्रवास मुक्तीचा ||

संतानी सांगितलेला मार्ग अवलंब, ज्ञान-कर्म-भक्तीचा |
सुखकारक होईल मग प्रवास मुक्तीचा ||

संचिताचे होईल ज्ञान, प्रारब्धासाठी भाव भक्तीचा |
क्रियमाणाचे निष्काम कर्म संपवेल मग प्रवास मुक्तीचा ||

कोऽहम्

बाळ गोडूले, बाळ सोनुले
बाळ छकुले, बाळ तान्हुले                       ( कोऽहम् )

मुलगी झाली झाली मुलगी, पहिली बेटी, पेटी धनाची
नात आमची लाडाची, नात मालतीगोविंदांची         ( कोऽहम् )

कन्या जरी परधन, लाडाकोडानी वाढवायची
काळजाचा तुकडा , कन्या मनीषाकुमारांची          ( कोऽहम् )

 स्नुषा म्हणजे दुसरी मुलगी, प्रेमाने-हौसेने स्वीकारायची
आमची मंजिरी, स्नुषा विजयाश्रीकांताची             ( कोऽहम् )

भार्या म्हणजे सहधर्मचारिणी, सखीसोबती आनंद-दुःखाची
वेडुली मैत्रीण, भार्या विवेकाची                    ( कोऽहम् )

माता तरी  Friend, philosopher - guide वाटायची
आई माझी सबकुछ,  माता ओमकाराची            ( कोऽहम् )

कन्या-स्नुषा-भार्या-माता तरी, मी नाही कोणाची
सगळे जरी माझे तरी, मी नाही कोणाची
एकटी मी तरी, प्रवास जन्मोजन्माचा
प्रवास मला उन्नत करण्याचा, प्रवास माझ्या मुक्तीचा ( सोऽहम् )


Monday, 9 December 2013

Passion Jewellery: Earrings

Hi all,
Earrings catalog is moved to following address:
Please click on this link to see all images.