फडक्यांच्या घरी सातवे कन्यारत्न जन्मले
लाडाचे शेंडेफळ माझी माय ती ||
भावासी माया लावी बहिणींनाही वात्सल्य देई
भाचारांची लाडकी मावशी माझी माय ती ||
आदर्श असे सून ती, आदर्श असे वहिनी
आदर्श अर्धांगिनी माझी माय ती ||
कुमारांची आशा ती, कुमारांची मनीषा ती
मंजिरी-स्वप्ना-धनश्री ची आदर्श माय ती ||
माय माझी सखी, माय माझी गुरू
माय माझी दैवत, मी तिचे पाखरू ||
तिच्या वेलीवरची कळी मी
तिच्या छ्बीची सावली मी
तिच्या गुणांचे प्रतिक मी
तिच्या संस्काराचे प्रतिबिंब मी
तिच्या शिस्तीचा परिपाक मी
तिच्या अस्मितेचा ताठ कणा मी
इतकी वर्षे असे ती वेगळी अन वेगळी मी
परंतु आता झालो आहे मीच ती अन तीच मी ||
असेल जर पुनर्जन्म कधी, आई तुझ्याच पोटी जन्मेन मी
आई तुझ्याच पोटी जन्मेन मी ||
सुंदर कविता केली आहेस
ReplyDeleteसुंदर कविता केली आहेस !!!!
ReplyDeletegr8888