प्रत्येक घरी शास्त्रानुसार घटस्थापना केली जाते आणि पूर्ण ९ दिवस नंदादीप
अखंड तेवत ठेवला जातो. शक्तीचे रूप तेजोमय आहे. आपल्या संस्कृतीमध्ये अग्नी किंवा दीपाला आगळे स्थान आहे.
प्रत्येक मंगल कार्याच्या सुरुवात दीप प्रज्वलनाने होते. अग्नीच्या योगाने देवाला
आळवावे ही प्रथा जुनी आहे. अग्नी वा ज्योतीला सर्वात पवित्र वस्तू मानले आहे.
अग्नी अशुद्ध गोष्टी शुद्ध करतो. ज्योत प्रकाश देते व अंधाराकडून प्रकाशाकडे नेते.
ज्योत हे ज्ञानाचे सुद्धा प्रतिक आहे. अखंड नंदादीप लावण्यामागचे कारण असे की आपल्यामध्येही
एक ज्योत(आत्मज्योत) आहे ज्याचा आपल्याला विसर पडलेला आहे त्याची सतत आठवण राहावी
ज्यायोगे आपण त्या आत्मज्योतीचा शोध घेऊ व त्याप्रमाणे साधना करू. (नवरात्रीचा
काळ हा साधनेसाठी व आत्मशोधासाठी आहे) कुठल्याही साधनेमध्ये अहंकार रहित होणे हे
महत्वाचे मानतात. कारण अहंकार हा सगळ्यात मोठा शत्रू आहे. जेंव्हा अखंड ज्योत तेवत ठेवतो तेंव्हा ती अहंकार जाळण्याची आठवण
करून देते. (दिवा हे देहाचे व वात अहंकाराचे प्रतिक) अहंकार जाळला किंवा नष्ट झाला
तरच आपल्या आतल्या ज्योतीचे दर्शन होणे शक्य आहे. बरेच जणांचा ह्यावर आक्षेप असतो
की खूप तेल वाया जाते त्यापेक्षा गरिबाला द्यावे वगैरे.(पण असे म्हणणारे लोक ना
दिवा लावतात ना गरिबांना देतात) मलाही
वाटते की जर एखाद्याची ऐपत नसेल तर त्यांनी हे करू नये. शेवटी भाव महत्वाचा. पण जे
लोक बाकीच्या ठिकाणी प्रचंड उधळपट्टी करतात त्यांनी फक्त देवाच्या पुढे दिवा लावण्याच्या
बाबतीत काटकसर करू नये. देवालाही कुठलीच अपेक्षा नसते. पण ह्या सगळ्या procedural गोष्टी
करण्यामागे भावनिर्मिती करणे हा सुद्धा उद्देश्य आहे. दिवा लावण्यामुळे पवित्र
वातावरण निर्मिती होते. (हे देवाकरता नसून आपल्या स्वतःकरता आहे ) साधनेमध्ये
जेंव्हा प्रगती होईल तेंव्हा कुठल्याही उपचारांची आवश्यकता राहणार नाही पण तोपर्यंत
हे सगळे करणे जरुरीचे आहे आपल्याला सगळ्या गोष्टींची आठवण करून देण्याकरता आणि त्या
अंगवळणी पडण्याकरता. जेंव्हा आपण ह्या सगळ्या procedural गोष्टी भावपूर्ण होऊन करू,
समजून व उमजून करू तेंव्हाच त्याचे खरे फळ मिळेल.
दिवस तिसरा
रूप: शरीराचा रंग सोन्यासारखा चमकणारा आहे. या देवीला दहा
हात आहेत. या दहा हातामध्ये खड्ग, धनुष्यबाण आदी शस्त्रे आहेत.
देवी: श्री लक्ष्मी
देवीचे तत्व: अग्नी
वाहन: वाघ
रंग : पिवळा
तत्वाशी संबधित आकार: ३ बंद पाकळ्या
साधना: साधकाचे मन 'मणिपूर' चक्रात प्रविष्ट होते
मंत्र :
पिण्डजप्रवरारूढा चण्डकोपास्त्रकैर्युता।।
प्रसाद तनुते महां चंद्रघंटेती विश्रुत।।
नऊ दिवसाचे नऊ गोल
आजचा रंग: पिवळा || गोल:
तिसरा || आकार: ३ बंद
पाकळ्या
One should continuously(beaded rosary)control the fire(solar plexus) within by using our sharp intelligence(sword)and balancing the mind(trishul)by focusing on one point(arrow and bow) practising detached attachment(lotus),accepting things as they are(kamandalu) and killing the negative energies by using gada(power) when needed.
No comments:
Post a Comment