आपल्या सगळ्यांना पांडव व कौरवांची गोष्ट माहीतच आहे. धृतराष्ट्राच्या अतिमहत्वकांक्षेमुळे व आंधळ्या प्रेमामुळे उन्मत्त झालेले दुर्योधन / दुःशासन व इतर कौरव आणी लहानपणीच वडीलांचे छत्र हरवल्यामुळे पण महत्वकांक्षी कुंतीने प्रेमाने, सहृदयतेने वाढवलेले धर्म, अर्जुन, भीम,नकुल व सहदेव यांच्यात झालेले युध्द म्हणजे महाभारत.
अनेक नामुष्कीचे प्रसंग येवूनसुद्धा, युध्द थांबवण्याचे सगळे प्रयत्न फोल ठरल्यानंतर पांडवांनी कौरवांबरोबर युध्द पुकारले.युद्धाची तयारी दोन्ही बाजूनी बरेच वर्ष चालू होती कारण हे साऱ्या भारतवर्षाचे युद्ध होते. भगवान श्रीकृष्णानी अर्जुनाचे सारथ्य करायचे ठरवले.
जेंव्हा युध्द चालू झाले तेंव्हा अर्जुनाच्या मनात अनेक भावना उचंबळून आल्या व तो शस्त्र उचलावयास तयार होईना. आपले गुरुवर्य, सगेसोयरे यांच्याविरुध्द युध्द करण्यापेक्षा संन्यास घ्यावा अश्या भावना त्याच्या मनात येवू लागल्या. तेंव्हा भगवानांच्या लक्षात आले की हा प्रश्न दिसतो तितका लहान/सोपा नाही. त्यांना अर्जुनाच्या प्रश्नांचे ( problems ) चे कारण ( root cause ) कळले व त्यांनी वरवर प्रश्न सोडवण्याऐवजी root cause नष्ट करण्याचे ठरवले व गीतेला प्रारंभ झाला.
५ ० ० ० वर्षापूर्वी लिहिलेला परंतु outdated न झालेला हा ग्रंथ आहे कारण हा कुठलाही जाती,धर्म,वर्ण, लिंग ह्याकरता नाही. ज्यांना कुणाला ज्ञान मिळवण्याची इच्छा आहे त्यांच्याकरता आहे. ५ ० ० ० वर्षापूर्वी मानवाचे प्रश्न तेच होते व आताही आहेत त्यामुळे गीता आज जशीच्या तशी अर्जुनाप्रमाणे प्रत्येक माणसाला लागू आहे.
गीता तरुणांना कसे जगायचे तर वृद्धांना मरणाला सामोरे कसे जायचे ते शिकवते. मरण म्हणजे अंत नाही तर अजून एका आयुष्याची सुरुवात हे शिकवते.गीता जे अज्ञानी आहेत त्यांना ज्ञान तर जे ज्ञानी आहेत त्यांना माणुसकी शिकवते. जे निर्बल आहेत त्यांना शक्ती/ दिलासा देते तर जे सबल आहेत त्यांना जगण्याची दिशा देते. गीता मनावर नियंत्रण व मनाचे training शिकवते. तणावमुक्त जीवन कसे जगायचे ते शिकवते. थोडक्यात प्रत्येक मनुष्याला त्याला उपयोगी पडेल असे मार्गदर्शन करते. ज्यांना हे जीवन ज्ञान मिळवायचे आहे त्यांनी गीता एकदातरी जरूर वाचावी - कळवून घ्यावी व आत्मसात करण्याचा प्रयत्न करावा.
No comments:
Post a Comment