सद्गुरुप्राप्ती
म्हणजे पूर्वसुकृताचे फळ
सद्गुरुप्राप्ती
म्हणजे कार्यसिद्धीचे बळ||
सद्गुरुप्राप्ती
म्हणजे मातेचा प्रेमळ ओलावा
सद्गुरुप्राप्ती
म्हणजे चित्तशुद्धीचा ठेवा ||
सद्गुरुप्राप्ती
म्हणजे जीवनाची सार्थकता
सद्गुरुप्राप्ती
ने संपेल ज्ञानाची व्याकुळता ||
सद्गुरुप्राप्ती
ने येते स्व-स्वरुपाची प्रचीती
सद्गुरुप्राप्ती
ने होते दिव्य आध्यात्मिक जागृती ||
सद्गुरुप्राप्ती
म्हणजे अक्षय आनंदाचा ठेवा
सद्गुरुप्राप्ती
म्हणजे सायुज्यमुक्ती सकल जीवा ||
No comments:
Post a Comment