Monday, 23 September 2013

मनातले

॥ ओम ॥ 

लहानपणापासून मला लिहायची आवड होती. मी लहानपणी खूप बोलकी नव्हते पण मनात असलेले सगळे लिहायची . त्याला फार मोठा साहित्यिक दर्जा होता असे नाही किंवा फार क्लिष्ट वा अलंकारीक असे काही नसायचे. असायचे मनातले काही आवडलेले, काही न आवडलेले, खुपलेले,भारावलेले,भीती वाटलेले,करावेसे वाटलेले असे सगळे मनातले.
शाळा सुटल्यावर college , नोकरी,लग्न ह्या सगळ्यात  वेळ नाही म्हणून(excuse ) लिहिणे सुटले. पण आता वेळ काढायचा ठरवलंय . काहीतरी आवडलेले, काही न आवडलेले, खुपलेले,भारावलेले,भीती वाटलेले,करावेसे वाटलेले, अचंबित करणारे आणी आता काही अनुभवाचे  असे सगळे मनातले लिहायचा मानस आहे. 

Thursday, 19 September 2013

Quilling - Paper rolling

पेपर रोलिंग बद्दल थोडेसे

Quilling किंवा पेपर रोलिंग हि एक Egypt मधील जुनी कला आहे. बऱ्याच ठिकाणी ती १६ ते १७ व्या शतकातील फ्रेंच व इटालीयन कला आहे असाही संदर्भ आहे. १९७० च्या सुमारास अमेरिकेमध्ये परत ह्या क्राफ्ट चा उदय झाला. त्यामुळे काळाच्या पडद्याआड जाणे व परत येणे हे चालू आहे. Quilling चा उपयोग पेपर ला रोल करून, चिकटवून वेगवेगळे आकार देऊन सजावटीसाठी केला जातो. कार्ड्स , pictures, purse, jewellery ह्यांच्या सजावटीसाठी होतो. फक्त निरनिराळ्या रंगाच्या paper strips लागत असल्यामुळे कुणालाही, कधीही शिकता येतो.







 

 



पुस्तक परीक्षण - शब्द - Les Mots

नमस्कार मंडळी,
नुकताच बंगलोर मध्ये  साहित्य मेळावा झाला . विषय होता - अनुवादाच्या झरोक्यातून.
बंगलोर मधील ६ पुस्तक भिशीनी त्यात भाग घेतला होता. आम्हा सगळ्यांना मांडायला वेगळे - वेगळे  विषय दिले होते. कार्यक्रमाला पाहुण्या म्हणून उमा कुलकर्णी , शशी देशपांडे , सानिया, बोकील, सरस्वती रिसबूड अशी मंडळी आली होती. त्यांनी अनुवादित साहित्यातील समस्या, करताना ठेवायचे भान, काही मजा आणि आव्ह्याने लेखक म्हणून कशी येतात हे आम्हाला सांगितले.
आमच्या भिशीला विषय होता - अभारतीय साहित्य व त्याचे मराठीतील भाषांतर. आमच्यापैकी एकीने आढावा घेतला कि कुठली पुस्तके अनुवाद झालीत, कुठल्या भाषातील वगैरे व दोघींनी पुस्तक परीक्षण केले.
जौ पौल सार्त्रे ह्या फ्रेंच लेखकाच्या " लेस मोट्स - the words " ह्याचे भाषांतर मराठीमध्ये Dr. दिवेकर ह्यांनी " शब्द " ह्या पुस्तकात केलेय. मी त्या पुस्तकाचा परिचय किंवा परीक्षण केले. त्यातील बराचसा भाग इथल्या मराठी मंडळाच्या website वर upload केलाय. मी त्याची लिंक पाठवतीय. वेळ मिळेल तेंव्हा नक्की वाचा. 

आजोळच्या आठवणी

नमस्कार मंडळी,
काल  मामाला  पत्र लिहियाचा योग आला ( योगच म्हणावा लागेल कारण कित्येक वर्षांनी पत्र लिहिले) आणि सांगलीच्या सगळ्या आठवणी  परत जाग्या झाल्या. सगळ्या मी ओंकार ला सांगितल्या, मला वाटले तो म्हणेल, "मग काय" पण त्याला सगळे ऐकून  खूप मजा  वाटली व मला ऐकून  खूप आनंद झाला कारण तो म्हणाला की आई मी त्यावेळी जन्मायला हवे होते.  :)
आम्ही दर मे महिन्यात आजोळी- सांगलीला  जायचो. मला आठवतेय देऊळ, घर, बाग व कौलारू घर व प्रेमळ  आजीआजोबा . आजोबांची  माझी एक च आठवण आहे ती म्हणजे आरतीला त्यांच्या मागोमाग पळत पळत जायचे, इतकी गर्दी असायची पण आरती झाल्यावर देवाला पहायची घाई, मग आजोबांच्या खांद्यावर चढून बाप्पाकडे पहायची व खडीसाखरेचा प्रसाद खायची. 
मे महिन्यामध्ये तर चंगळ असायची, सगळी भावंडे यायची , मग एकत्र जेवण, गप्पा, दंगा , बागेत जायचे, नदीवर जायचे, एकत्र अमरस करायचा मोठ्यांनी व लहानांनी कोई व साली खाण्यासाठी भांडायचे ( आजकाल मुलांना आमरस खावा म्हणून मागे लागावे लागते) रात्री बाहेर बाजल्यावर झोपून चांदण्या पहायच्या , ते लिंबोणीचे  झाड व त्यावर बसलेल्या कोकिळा, त्यांना  ओरडून- ओरडून चिडवायचे  व मग त्या चिडल्या की हसत बसायचे. खास कार्यक्रमाला लांब जावे लागायचे तिकडे जाताना गप्पा, त्यातून रात्री लागली तर ४ जणानी जायचे सोबतीला.  आजीच्या हातचे छान जेवण , साखरांबा, गुळांबा , लोणचे व सुपारी. मला एक आठवण आवर्जून सांगायची आहे जी माझ्या मनात कायमची कोरली गेलीय. 
मी, स्वप्ना , जोत्स्ना व सीमा आम्ही पाठोपाठच्या मावसबहिणी. मी ४-५ वी मध्ये असेन. आम्ही सगळे खेळत होतो, तेवढयात खूप माकडे (हुपले ) आली व हैदोस घालायला लागली. आम्ही सगळ्या खूप घाबरलो व सगळी दार व खिडक्या बंद करून बसलो. त्यांचा दंग अजून वाढला. कोणाला सांगायचे तरी दार उघडून बाहेर जावे लागणार होते मग कोण जाणार?
तर ……। 
आजीने काय करावे?
आजीच्या दोन्ही पायांना दुखापत झाल्याने ती कुबड्या घेऊन चालायची. तिने रामाचा फोटो घेतला व कुबड्या घेऊन, एका हातात फोटो घेऊन एकटीच बाहेर गेली. आम्ही चौघी आ वासून काय चाललेय  ते पाहत होतो . बाहेर जाऊन तिने त्या माकडांना रामाचा फोटो दाखवला व त्यांना खूप सुनावले, तुम्हाला रामाची शप्पथ वगैरे 
आणी काय आश्चर्य ……. ती माकडे निघून गेली . 
आजीची अशी अवस्था असताना तिने जायचे केलेले धाडस, तिचा रामावरचा विश्वास व अश्या प्रसंगी असे काहीतरी सुचावे  हे मला तेव्हाही अचंबित करायचे व आजही. 
ओंकार  म्हणाला  my Panaji was such a brave lady  आणि आम्ही खूप हसलो . 

फेसबुक - Global Katta

नमस्कार मंडळी
हल्ली कुठेही जा&nbspभिशीला  पार्टीला /get -together वा हळदीकुंकवाला  सगळीकडे विषय असतो
"अग माझा FB वरचा फोटो पाहिलास का?"
"अग तुझे  ट्रीप चे फोटो टाक ना FB  वर "
तुझी comment मला आवडली "
"तिने like केले नाही अजून"
"अय्या तू FB वर नाहीस? ( outdated  आहेस )
हल्ली घरातील प्रत्येक माणसाचे - आईबाबांचे , आजीआजोबांचे ,अगदी  वर्षाच्या चिक्कुचेही FB account असतेमी विचार करत होते काय बरे असेल FB चे success secret?का बरे सगळ्यांना हि concept आवडली?
मला लहानपणचा आम्ही राहत असलेला वाडा आठवतोयत्या वाड्याच्या बाहेर कट्टा होतातिकडे आळीपाळीने वाड्यातील माणसे दिवसभर बसलेली असायचीकरायचे काय तर -अल्यागेल्यांकडे पाहायचे /बोलायचेगप्पा मारायच्या / इकडच्या तिकडच्या बद्दल विचारायचेथोडक्यात timepass .
हल्ली झालेय असे कि कुणाला कुणाकडे गप्पा मारायला जायला वेळ नाही कि कुणाला बोलवायला 
वेळ नाही.  कुणाशी फोनवर गप्पा मारायलाही वेळ नाहीअगदी timepass करायलाही वेळ नाहीपण मानवी स्वभावाप्रमाणे उत्सुकता तर नक्कीच आहे. FB मुळे हा कट्टा गल्लीपुरता मर्यादित  राहता वसुधैव कुटुंबकम प्रमाणे मोठा झालाय . साऱ्याजगभरच्या " माझ्या जवळच्या " माणसाना जोडणारादिवसातले - बसले कि सगळ्यांची खबर कळते. कुणाचे काय चाललेय?कोण,कुठे,काय करतेयकोण कुठे जाऊन आले?कोण कसे दिसतेयकित्येक वर्षे  भेटलेले , खबरबात नसलेले नातेवाईक  मित्र-मैत्रिणी चे काय चाललेय?
हल्ली छोट्या  विभक्त कुटुंबामुळे कौतुक करायलाही कोणी नाही. FB वर टाकल्यावर "like ", "comment ", "share"  मुळे तेवढेच सुखावायला होतेछोट्यातील छोटी गोष्ट फक्तआपल्या मित्रांना नाही तर मित्रांच्या मित्रांच्या मित्रांच्या मित्रांनाही पोचते . बर फार निबंध लिहायचीही गरज नाही फक्त  WOW!, Nice, Great, Like, :), LOL एवढे लिहिले कि भावना पोहोचल्या . कमीत कमी वेळात जास्तीत जास्त लोकापर्यंत पोचत येतेछोट्या business marketing साठी  फारच छान . कधीही / कुठेही / कसेही मत प्रकट करण्याचीमुभा .
थोडक्यात काय माणूस हा भावनांचा / ओलाव्याचा आधीही भुकेला होता / आहे आणि नेहमीच राहील

नेमकी हीच गोष्ट FB ने काबीज केलीयमाणसांच्या भावना मोकळ्याकरायला एक  platform दिलाय आणी हेही मान्य करायला हव की FB मुळे वसुधैव कुटुंबकम हे अगदी खरे झालेय.

मराठी दागिने

नुकतीच बातमी वाचली की  नवीन serial येतीय - महाभारत आणी त्याचे budget आहे    करोड . ऐकून  वेडलागायची वेळ आली . कुतूहल म्हणून मी ती serial पहिली की काय आहे ह्यात शंभर करोड चे , तेंव्हा भव्य
locations , भव्य सेट दिसले पण त्याबरोबर अजून एक गोष्ट notice केली ती म्हणजे दागिन्यांचा प्रचंड वापर.
सगळ्यात पहिला विचार मनात आला की एवढे दागिने घालून हे लोक चालू बोलू  वावरू कसे शकतात? - किलो वजन त्याचे नक्कीच असेल.
दागिन्यांचे  भारतीयांचे नाते युगायुगांचे आहे सोन्याचे,चांदीचे,मोत्याचे,हिऱ्याचे आणी माणिकपाचूचे असे 
अनेक प्रकारचे किमती दागिने घालण्याची प्रथा आहे. कुतूहल म्हणून मी दागिन्यांची नावे आठवायला लागले तर यादी पाहून थक्क व्हायला झाले. अगदी फक्त महाराष्ट्रीयन , सोन्याचे  फक्त बायकांचे दागिने 
विचारात घेतले तरी एवढे प्रकार आहेत.
गळ्यातील: मंगळसूत्र , साखळी , सर ,मोहनमाळ , पोहेहारपुतळेहार, ठुशी,
कोल्हापुरी साजचिंचपेटीजोंधळेहार, लक्ष्मीहार,वज्रटिक , सुर्यहर , चंद्रहार , चपलाहारतन्मणी, गोफ
कानातील : कुड्या, भोकर , रिंगा , वेल , कान, झुबे , बुगडी
हातातील: पाटल्या , बांगड्या, तोडे, गोठ , बाजूबंद , वाकी , अंगठी
पायातील: पैंजण, तोरड्या , वाळे , चाळ , जोडवी , मासोळी , बिरोड्या
कमरेवरील: कंबरपट्टा, मेखला , छल्ला
नाकातील: नथनी , नथ , चमकी  मोरनी 
खरेतर आता एवढे दागिने कुणाकडे असणे शक्य नाही व असतील तरी ती कुठे घालून जाण्याची सोय राहिलेली नाही. पण ही यादी आपल्याला आपल्या वैभवशाली इतिहासाची व परंपरेची आठवण नक्की करून देईल ही आशा !!
Do send names if you know anything which I missed.