गेल्या एक महिन्यापूर्वी मी blogging चालू केले
ते माझ्या मनातले पोहोचवण्यासाठी, माझे मन मोकळे करण्यासाठी आणी माझ्या सगळ्या
जवळच्याच्याबरोबर share करण्यासाठी. पण हे लक्षात आले की ह्या प्रवासात मी एकटी
नाही.......My near and dear ones are reading, enjoying and looking forward for
posts.......आणी तोंडभरून कौतुकही करत आहेत, माझा उत्साह वाढवत आहेत मला sms आणी
mail करून ........आणी मन सुखावलं!!!!
त्यामुळे आपल्या सगळ्यांचे धन्यवाद कसे द्यावेत
हे समजत नव्हते......म्हणून त्यासाठी ही खास पोस्ट. माझे लेख वाचून आपण सर्वांनी
त्यावर आवर्जून अभिप्राय दिल्याबद्दल अनेक अनेक धन्यवाद!!!! असाच स्नेह
ठेवा.............................................Tuesday, 29 October 2013
Monday, 28 October 2013
Unlimited buffet
माझ्या मुलाच्या वाढदिवसाकरता planning चालले होते.
त्यांनी ठरवले की अगदी जवळच्या ७-८ जणांना तो बोलावणार आहे.त्यांना चित्रपट
पाहायचा असल्यामुळे घरीच लंच करायचे ठरले. मला ऐवढे सांगून तो आपल्या कामाला गेला
की, everyone including himself will
prefer Chinese food. माझ्या डोक्यात काय करायचे त्याचे चक्र चालू झाले. व्हेज
चायनीज लंच म्हणून मग मी Fried rice /
Hakka noodles/Gobi Manchurian / Soup असे main course ठरवले आणी starters म्हणून Popcorn/ Cake and Chilli potatoes. वाढत्या वयाची मुले व जेवायची वेळ असल्यामुळे हा मेनू
perfect आहे असे माझे मत होते. मेनू ऐकून तोही खुश होईल म्हणून मी लगेच सांगायला
गेले, तर त्याचा response
" येवढेच"
मी म्हणाले अरे व्हेज चायनीज लंचमध्ये अजून काय
करणार? हे हेल्दी आणी पोटभर दोन्ही आहे, माझ्यातील आई जागी झाली.त्याच्यातील हि teenage मुलगा जागा
झाला,म्हणाला, Unlimited buffet मध्ये किती पदार्थ असतात. मग मीही अरे हे घर आहे, हॉटेल
नाही असे सुनावले. आणी मग जशी teenager मुलांची आणी आयांची जुंपते तशी आमचीही
जुंपली. पण दिवसभर Unlimited buffet हा शब्द डोक्यात
घुमत होता.
अमर्याद स्वेच्छ्या भोजन म्हणजे आपण मराठीत
ज्याला Unlimited buffet म्हणतो तो सध्या बोकाळलाय. कुठल्याही restaurant मध्ये जावा South / North / Italian / Mexican / Lebanese /
Gujarati/ Rajasthani / Kerala सगळीकडे बुफे जास्त करून
पाहायला मिळतो. लोकही हल्ली हेच prefer करतात मग restaurant वाल्यांचे काय जातेय?
Unlimited buffet म्हणजे ७-८ प्रकारची starters/ soups/ 10 course main course/ दहा प्रकारची deserts
असा प्रचंड spread असतो. एक-दोन महिन्यापूर्वी आम्ही डिनर ला गेलो
होतो, तो spread येवढा spread करून ठेवला होता की डिशेस भरून आणेपर्यंत दमछाक व्हावी व
परत भूक लागावी. मी नवऱ्याला म्हणाले आपल्याला गायीसारखी ४ पोटे नाहीत, एकच पोट
किती खाणार?
तो नॉर्थ इंडिअन बुफे होता, ७-८ प्रकारची लोणची,
असंख्य प्रकारचे पापड, चटण्या, सलाड चे बरेच प्रकार, ७-८ प्रकारची starters, २-३ प्रकारची soups, ५-६ प्रकारच्या भाज्या, ४ प्रकारचा भात, नूडल्स, थाई करी,
तुम्हाला कुठल्या प्रकारची रोटी पाहिजे तसे ते आणून देणार, सगळ्याची taste हवी
असेल तर तसे आणी दहा- बारा प्रकारची deserts
हा---------------------------------- अक्षरशः
लिहितानाही दम लागला. बर हे फक्त व्हेज वाल्यांसाठी.
प्रत्येक पदार्थाचा एक घास खायचा म्हणाले तरी ४
पोटे लागतील. बर प्रत्येकवेळी
डिश बदलायची, हि गोष्ट माझ्या जीवावर येते, किती काम वाढवतो आपण सगळ्यांचे. आणी
येवढा स्प्रेड म्हणून पैसेही भरपूर. तुम्ही खावा न खावा त्यांनी मेहनत तर
घेतलीय. पण म्हणतात ना ही किंमत आपण मोजतो ते काही क्षण तुम्हाला राजासारखे वागवले
जाते. You spent some time like King. काय पाहिजे ते मिळेल मागून तर बघा. एवढे सगळे असूनसुद्धा
काहीतरी विचित्र मागणारे लोकही मी पाहिलेत. १०० पदार्थ समोर असताना पण मला तेच
पाहिजे किंवा हे का नाही अशी हुज्जत घालणारे लोक पाहिलेत.
अगदी भारतीय - महाराष्ट्रीयन सर्व सामन्याच्या
घराचा विचार केला तरी उजवीकडचे / डावीकडचे असे ७-८ पदार्थ असायचेच. चटणी /
कोशिंबीर / उसळ /भाजी / आमटी / पोळी / भात /ताक असा रोजचा मेनू असायचा सणाच्या दिवशी
कडी-वडा / तळण / मसालेभात / गोड पदार्थ असा भरगच्च मेनू असायचा. पूर्वी सगळ्या
बायका व पुरुष यांना शारीरिक कष्ट इतके असायचे की येवढ्या अन्नाची गरज होती. खायची
व पचवायची ताकद होती. पण हळूहळू Automation
/ lifestyle मधल्या बदलामुळे शारीरिक
कष्ट कमी झाले आणी खाणेही.
आजकाल तर एकीकडे लोक diet करताना दिसतात म्हणजे ऐक
पेढा खायचा असेल तर २ फेऱ्या जास्त किंवा १० मिनिटे व्यायाम जास्त करायचे असे चालू
असते तर दुसरीकडे हे Unlimited buffet प्रकरण. हल्ली
सगळ्या ऑफिस मधल्या पार्ट्या अशाच असतात. आजकालच्या मुलानाही त्यामुळे घरीही आईने
एवढे पदार्थ करावेत अशी अपेक्षा असते.
पूर्वी कुतूहल म्हणून, नाविन्य म्हणून बुफे
चांगला वाटायचा पण हल्ली ना खिशाला ना वयाला ना पोटाला तो परवडतोय!! कारण एकतर
एवढे पैसे द्यायचे, पैसे दिले म्हणून नको इतके खायचे, जास्त खाल्ल्यामुळे आठवडाभर मेहनत
केलेली वाया घालवायची, एक दिवस जास्त खाल्यामुळे दिवसभर अजगरासारखे लोळत पडायचे आणी
त्रास सहन करायचा त्यापेक्षा नको तो Unlimited
buffet!!!!!
(Unlimited
buffet करता मराठी शब्द अमर्याद स्वेच्छ्या भोजन सुचवल्याबद्दल
सौ वृषाली फडके यांचे आभार)
Monday, 21 October 2013
ऐकावे ते नवलच!!!
नुकताच मी एक सेमिनार attend केला, seminar होता teenager's च्या parents करता. सेमिनारमध्ये सगळ्या parents चे हे मत होते की आपल्या आईवडिलांना आपले काय होईल ही अजिबात काळजी नव्हती त्यामुळे आपल्यालाही. पण आता आपणच competition मुळे इतके pressure घेतो की त्यामुळे मुलेही stressed असतात. तेंव्हा तिथे आलेल्या डॉक्टर नी सांगितलेले मला पटले की खरतर tension तुंमच्या आईवडिलांनी घ्यायला पाहिजे होते कारण choices limited होते. पण आता kids will do something good of their life with so many career choices available.
Career चा decision सगळ्यांच्या जीवनातला मोठ्ठा decision असतो. खरतर हा decision घ्यायची वेळ आयुष्यात ३-४ दा येते. वयाच्या १६, २८ ते ३० आणी ४० ते ४५ च्या दरम्यान आणी ६० व्या वर्षी सुद्धा ( हो, retirement नंतर काय हाही प्रश्न हल्ली महत्वाचा झालाय) पण तरीही १६ व्या वर्षीचा निर्णय हा सगळ्यात महत्वाचा व तो योग्य व्हावा यासाठी सगळेजण आपापल्या परीने प्रयत्न करीत असतात.
खरतर हा decision जेंव्हा स्वतःच्या बाबतीत घेतला तेंव्हा Colleges/ Career choices / exposure इतके limited होते. Engineering / Medicine / Science/ Commerce / Arts / Teaching / Armed forces येवढेच. हळूहळू परिस्थिती बदलत गेली exposure वाढले आणी choices ही. Engineering व Medicine च्या शाखा वाढल्या / Science चे विषय वाढले / MBA / CA / Sales/ Marketing/ Finance / HR / Media/ Mass communication/ Advertising / Architecture/ Fashion design / Graphics design / Journalism / Politics / News anchoring / Information Technology / Environment Science / Photography / Flying - Pilot / Beauty पार्लर / Spa अश्या अनेक courses नी मान्यता मिळवली. Even Bollywood started running like companies with CEO from IIMs and with highly learned technicians .
बहुतांशी जो कुठला कोर्स केला असेल तेच काम लोक आयुष्यभर करत असतं. आपल्या आवडी ह्या hobby म्हणून नोकरी बरोबर सांभाळल्या जायच्या पण आता तोही pattern बदलला. हल्ली काही लोकांनी hobby हेच profession केलेय.
मी ऐकलेले काही हटके courses आणी professions ........
मी ऐकलेले काही हटके courses आणी professions ........
(ह्याव्यतिरिक्त तुम्हाला courses आणी professions माहित असतील तर जरूर कळवा.)
काही हटके कोर्सेस:
- · Forensic Science - CID ना लागणाऱ्या technical माहितीसाठी
- · Wildlife Photography - ३ idiot नंतर प्रसिद्धीस पावलेले
- · Jewellery design - सोने-चांदी- हिरे याचबरोबर हल्ली teracotta / paper/ kundan / metal wires अश्या अनोख्या jewellery ची ही मागणी वाढलीय, ते design करणारे ( पूर्वी हे वंशपरंपरेने शिकले जायचे पण आता ज्यांना आवड आहे ते करू शकतात)
- · Course in Radio Jockeying and Voice Over- RJ - परत एकदा रेडीओ ला चांगले दिवस आल्यामुळे
- · Course in Archaeology and Ancient history
- · Ornithologist - Study of birds
- · Hospital management / Resort management / Event management / Social entrepreneurship - पूर्वी अशी degree नव्हती
- · Image Consulting - Talent बरोबर हल्ली व्यवस्थित दिसण्यालाही खूप महत्व आलेय अशी मदत करणारे
- · Course in Showroom design - हल्ली shoppers choosy झालेत त्यामुळे shoppers ना attract करण्याकरता Mall मधले Showroom design महत्वाचे झालेय
(These courses are not available but people are converting there hobbies/passion into profession)
- · सगळ्यात जास्त लोकांपर्यंत पोहचण्याचे TV सारखे दुसरे माध्यम नाही त्यामुळे TV Advertisement मध्ये जे अन्न, फळे, भाज्या दाखवतात त्या खऱ्या कश्या दिसतील हे पाहणारे आणी त्याप्रमाणे तयार करणारे
- · हल्ली सगळ्या पौराणिक serials चे दिवस आहेत त्याकरता खास sets, दागिने, कपडे याचे design करणारे
- · हल्ली अजून एक नवीन म्हणजे reality shows - cooking, dancing,singing, comedy ह्यामध्ये कुणी काय बोलायचे ह्यासाठी लेखक
- · दूरदर्शन वरील जाहिरातीकरता - writers / singers / musicians
- · Personal Shoppers - हल्ली लोकांकडे पैसा असतो पण वेळ नसतो अश्या खास लोकांकरता shopping
- · Scuba diving trainers - ज्यांना स्वीम्मिंग आवडते त्यांना हौस आणी profession दोन्ही
- · Internet marketing - हल्ली Google तरुण पिढीची जीवनाचा महत्वाचा भाग झालाय अश्या इंटरनेट savvy लोकांच्या सारखे समोर राहायचे असेल तर आपली website/product नेहमी first १० searches मध्ये ठेवायचे ( हो हे profession आहे )
- · Teaching Mountaineering / Trekking - त्यांना फक्त वर्षातून एकदाच २ महिन्याकरता जावे लागते
- · Career Counselling - हा सगळ्यात मोठा business झालाय
- · Related to Pets - pets restaurants / spas / bakeries / accessories / trainers / day care
Thursday, 10 October 2013
भाग्याची गोष्ट
गेल्या काही दिवसापुर्वीची गोष्ट
माझ्या कामवालीने माझ्याकडे दहाहजार रुपयाची demand केली (असे मधे-मधे छोटे-मोठे धक्के ती देतच असते. प्रत्येकवेळी कारण वेगळी असतात)
ती: दीदी १०,००० चाहिये, मेरे salary मे से काट लेना!
मी: ३ महिने पहेले लिये थे ना फिरसे क्यू चाहिए?
ती: दीदी सबने हा बोला है! मै किसीसे १०,००० और किसीसे २०,००० ले रही हू....... तुम तो २०,००० दोगी नही, इसलिये १०,००० मांग रही हुं
मी: पर क्यू चाहिए इतने सारे पैसे?
(मनात - काय बाई आहे - माझ्या तोंडावर, माझ्याच घरात उद्धटपणा करते.......पैसे मागते कि order करतेय )
ती: दीदी, husband ने बोला है और TV पे दिखाया की सोने का भाव कम हो गया है......तो आजही सबसे पैसे लेके(एक लाख रुपये) उसका सोना लूंगी....कल भाव फिर बढेगा तो problem होगा .... सोना बाद मे काम आयेगा....मै saving नही करती ना?
मी: :( :O :^) (think) (shake) :|
असे जेवढे emoticon शक्य असतील तेवढी expressions दिली. एकाच वेळी तिच्या समाझदारीचे/ शहाणपणाचे कौतुक करावे/ मूर्खपणाबद्दल ओरडावे/सारखे पैसे मागते म्हणून रागवावे कि सगळ्यांकडून पैसे घेऊन नंतर पगाराचे काय करणार असे अनेक विचार माझ्या मनात येऊन गेले.
जेंव्हा मी हे नवऱ्याला सांगितले तेंव्हा त्याचेही अजून एक lecture ऐकावे लागले की ती अशिक्षीत बाई येवढा मार्केट condition चा विचार करून proactively decision घेतीय आणी तू?
परत एकदा सगळे emoticons........... :( :O :^) (think) (shake) :|
आणी माझी विचारचक्र जोरात फिरू लागली ....आजकालच्या service provider बद्दल ......worker क्लास बद्दल.....maids बद्दल.
पूर्वी आमच्या घरी जी कामवाली होती तिचे जग म्हणजे माझी आई. आई जे काही सांगेल ते ती ऐकायची. फारसे स्वतःचे डोके वापरायची नाही.नवरा दारू पितो म्हणून काम करायची वेळ आली होती तिच्यावर. माझ्या आईने तिला खूप मदत केली होती. शिक्षण अजिबात नाही त्यामुळे व्यवहार कळत नव्हता कि वागायचे कसे? माझ्या आईने तिला सगळे शिकवले. जशी आमची परिस्थिती बदलत गेली तशी तिचीही. तिच्या मुलीही आमची पुस्तके/कपडे वापरून मोठ्या झाल्या. अन्न/कपडे/वस्तू घेऊन जायला त्यांना कमीपणाचे वाटायचे नाही. ज्यांच्या घरी काम करतो ती लोक वेगळी आहेत, त्यांच्या सारखे आपले असावे हि इच्छ्याही नव्हती व महत्वकांक्षाही. असेच चित्र जवळपास सगळ्यांच्या कामवाल्यांचे होते.
पण परिस्थिती हळूहळू बदलली आणी आता फार वेगाने बदलतीय. बहुतेक मोठ्या शहरातील कामवाल्यांची पहिली पिढी थोडीफार शिकली, त्यांच्याकडे पैसा खेळू लागला. शिक्षणाबरोबर व सुविधाबरोबर त्यांची मानसिकताही बदलली. त्यांच्या इच्छ्या-आकांक्षा वाढल्या. TV घरी आल्यामुळे खूप गोष्टी कळू लागल्या. त्यांचेही मान-अपमान वाढले. आता त्यांना अन्न/कपडे/वस्तू दिलेल्या आवडत नाहीत. अगदी नवीन गोष्टी दिल्या तरी फारशी ख़ुशी नसते. कामाचा दर्जा व आपलेपणा कमी झाला पण अपेक्षा भरपूर वाढल्या. त्यानाही sunday ला सुट्टी हवी असते विश्रांतीकरता. माझी कामवाली मुलांना सुट्टीत फिरायला घेऊन जाते. मागच्या वर्षीच आमच्या सगळ्यांच्या कडून पैसे उधार घेऊन तिने गावाकडे plot घेतला.......आता सोने घेतेय. ती सकाळी ६ ते १ व ३ ते ९ अशी जवळजवळ १३-१४ तास काम करते म्हणून तिच्या मुलाला सांभाळायला व तिच्या घराचे काम करायला गावाकडून एक fulltime मुलगी घेऊन आलीय.
परत एकदा........... :( :O :^) (think) (shake) :|
पण हे सगळे ती करतेय कारण तिला माहित आहे सगळ्या दीदी तिच्यावर इतक्या अवलंबून आहेत. दीदींच्या घराची गाडी तिच्यामुळे सुरळीत चाललीय. आजकालच्या जॉब-घर-मुले व हेक्टिक lifestyle मुळे सगळ्या दीदीही तिच्यावर अवलंबून आहेत. त्यामुळे सध्याची हि नवीन म्हण आहे
Behind every successful women there is good maid.
आणी ही good maid मिळणे ही अगदी भाग्याची गोष्ट झालीय.मागच्या जन्मी नक्की काहीतरी पुण्य केलं म्हणून चांगली कामवाली मिळाली असे म्हणायला हरकत नाही.Monday, 7 October 2013
Quilling - Earrings
आम्ही एका पार्टी ला गेलो
होतो. तिथे एका मैत्रिणीचे कानातले पाहिले. अगदी कानातील आधी घेतले मग त्याला matching dress घेतला की
काय असे वाटण्याजोगे perfect
matching होते. विचारल्यावर तिने सांगितले की ह्याला quilling म्हणतात
आणी हे paper चे
बनलेले असते. माझ्या स्वभावाप्रमाणे मी जाऊन घेऊन आले सगळे सामान आणी काही गोष्टी
करून पाहिल्या. Paper च्या
पट्ट्या वेगवेगळ्या size व colors च्या
विकत मिळतात. तुम्ही घरीही कापू शकता पण विकतच्या convenient पडतात. Sizes , Colors आणी
Shapes वेगवेगळे
घेऊन अगणित combinations करता
येतात. Sky is limit.
मी करून पाहिलेली काही
designs...................
Sunday, 6 October 2013
श्वानायन
आतापर्यंत कुत्रे चावल्यावर १४ injections घ्यावी लागतात ह्या
मौलिक माहितीपेक्षा कुत्र्याबद्दल काहीही माहिती नसणारी मी कुत्र्यावर लेख लिहीन
असे स्वप्नातही वाटले नव्हते. माझ्या माहेरच्या व सासरच्या ७ पिढ्यात कुणीही
कुत्रे पाळले नव्हते व तसे करायची माझी व माझा नवरा यांची इच्छ्या नव्हती. पण
म्हणतात न कधी / कसे / काय घडेल हे त्याच्या हातात असते आणी झालेही
तसेच...........
ओंकारने २-४ वर्षे प्रेमाने/ रागावून/चिडून/वैतागून
DOG PET पाहिजे म्हणून हट्ट करून पहिले. पण ते शक्य नाही म्हणून मीही २-४ वर्षे
नकार देत राहिले. मी का कुत्रा? असा ultimatum ही दिला. त्यामुळे ओंकारने १ वर्ष FISH PET म्हणून
निभावून नेले. एक चे दोन करताकरता २० फिश चा tank घरी आला. पण त्यांचा काहीही
response नसल्यामुळे ओंकार त्यात रमला नाही व परत DOG साठी हट्ट चालू झाला. DOG
आणलास तर त्याचे मी सगळे करीन व परत
आयुष्यात कधीही हट्ट करणार नाही असे मला कबूल करून १९ फेब्रुवारी २०११ ला Doggie आमच्या घरी आला.
१-२ महिने कुठला breed आणायचं ह्यावर अभ्यास
झाला व सर्वानुमते labrador आणायचे ठरले. DOG ची हि वंशावळ (घराणे) असते व तो
घेताना ह्या गोष्टीला खूप महत्व असते व त्याची किंमत ठरते. असे सगळे पाहून आजोबा
अमेरिकन व आजी कडचे ऑस्ट्रेलिअन असे good pedigree असलेला LUCKY घरी आला. बरेच
Puppy झोपाळू आहे / जाड आहे / मठ्ठ आहे / ओरडतोय अश्या सबबीवरून आम्ही reject केले
व जो active होता/ हुशार दिसत होता व शांत आणी जगन्मित्र वाटत होता असा LUCKY
आमच्या घरी आला.
Doggie घरी आणायचा म्हणून भरपूर थेओरोतिकल
अभ्यास करून,ओळखींच्या लोकांबरोबर बोलून आम्ही तिघे श्वानसेवेकरता सज्ज झालो.
सर्वानुमते त्याचे नामकरण झाले. आणी पठ्ठ्या नावाप्रमाणे LUCKY आहे याची प्रचीती
यायला लागली कारण त्यांनी तोंड उघडायच्या आत ३ माणसे धावून जायला लागली. ३ parents
मिळाले त्याला. आणी आज दिवसभर lucku ने काय केले व काय केले नाही अश्या चर्चा
संध्याकाळी रंगायला लागल्या. लकीने काय खाल्ले, शिशू कितीवेळा केली ह्याचा count
ठेवला जावू लागला. लकी झोपला कि नाही / किती वेळ? / का झोपला नाही ह्यावर
चिंतासेशन होऊ लागले.
हौसेला मोल नाही ह्याचा अर्थ बन्गलोरे मध्ये
असलेल्या डॉगकरता सेवासुविधा पाहून कळतो. त्यांच्याकरता pet house आहेत / स्पा
आहेत / पार्लर आहेत/ त्यांचेही haircut / manicure / pedicure होते. रेस्तौरान्त्स
/ bakery / toys आहेत / त्याचेही बर्थडे पार्टी arrange होतात. return गिफ्ट्स हि
मिळतात. one day ओउतिंग arrange करता येते. त्यांना emotional problems येवू नयेत म्हणून डॉक्टर आहेत. त्यांचाही वेट
लॉस प्रोग्राम असतो / जिम असते / vitamins
/minerals/sugar/BP control ठेवण्याकरता रेगुलर visit
कराव्या लागतात.
श्वानायान पुढे चालू
......................................................................................
Tuesday, 1 October 2013
TV चे बदलते रूप व गरज
प्रत्येक नाण्याला नेहमी दोन बाजू असतात, मी फक्त एकच (चांगली)बाजू ह्या लेखात
मांडायचा प्रयत्न करणार आहे.
मला आठवतेय मी ५-६ वी मध्ये असेन. आम्ही जवळजवळ २५-३० मुले-मुली मिळून
खेळायचो. एके दिवशी एका मुलीने वार्ता आणली की देशपांडेंच्या घरी दूरदर्शन आला आणि
मग काय आमची सगळी झुंड गेली त्यांच्या घरी. त्यांच्या घराला एखाद्या लग्नघराचे
स्वरूप आले होते. केवढे लोक TV पाहायला आले होते.तो काळ होता १९८०-८२ च्या सुमारास
black and white TVचा आणी फक्त एकुलत्या एक channelचा. अगदी " आमची माती आमची
माणसे" हा कार्यक्रमही आवडीने पाहण्याचा. चित्रहार व छायागीत ची आठवडाभर वाट
पाहण्याचा. सगळ्याच कार्यक्रमांचा दर्जा उत्तम होता. देशपांडे चे कौतुक करावे
तितके थोडे कारण सगळ्यांना आवडीने व आनंदाने बोलावयाचे ते. त्यांचा मुलगा तर
हल्लीच्या भाषेत "भाई" झाला होता. TV पाहायला मिळेल म्हणून सगळे त्याचे
ऐकायचे.
Information Age
हळूहळू घरी-घरटी TVयायला लागले. आमच्याही घरी १९८४-८५ च्या सुमारास b/w TV आला.
त्या सुमारास एकसे बढकर एक कार्यक्रमांची रेलचेल होती. तो जमाना होता रामानंद सागर
यांच्या " रामायण" चा, गोविंद निहलानी यांच्या " तपास" चा
किंवा बुनियाद, हमलोग व खानदान अश्या उत्तम serials चा. रविवारी सकाळी रामायण चालू
झाले कि रस्तावर शुकशुकाट असायचा. आज्यातर TV ला नमस्कार करून बसायच्या. त्या काळात
TV चा रोल pure information होता. TV हा कुतूहलाचा विषय झाला होता व घरात
TV असणे status symbol :)
Enterntainment Age
त्यानंतर TV colour झाला. Channels वाढले/ कार्यक्रमही वाढले. १९९६-९७ च्या
Z-TV ने धुमाकूळ घालायला चालू केले.तेंव्हा परदेशातही आपला TV पाहता येवू लागला.
Serials ची संख्या वाढली.कार्यक्रमाचा दर्जा उत्तम होता. नंतर २००० मध्ये 'एकता
कपूर ' ह्या धूमकेतूने ह्यात प्रवेश केला आणी सगळे चित्रच बदलले. channels ची
संख्या वाढली. लहान व तरुण वर्गाबरोबर 'housewife' वर्गही पूर्ण capture झाला.'
सास-बहु saga' चालू झाला. २४ तास TV चालू झाला. बघा किती बघायचा तो. TV che Music / News / Entertainment / Movies
/ Knowledge/ cartoon channels असे वर्गीकरण झाले.
Reality TV Age
त्यानंतर सगळ्या regional language channels चे पेव फुटले.मराठी मध्ये ही १० channels सुरु झाले. मराठी मध्ये हि Music /
News / Entertainment / Movies / Knowledge असे प्रकार आले. आणी अजून एक वर्ग senior citizens चा त्यात addict झाला. आज कित्येक घरात एक-एकटे
आजी व आजोबा किंवा दोघेच राहतात. मुले दुसऱ्याघरी/गावी/देशी राहतात. अश्या सगळ्या
आजीआजोबांचा TV हा सोबती झाला. TV serials मध्ये / कार्यक्रमामध्ये काय चाललेय
ह्याचा मानसिक परिणाम ह्या group वर होणार नसला तरी घरात कोणीतरी आहे ही भावना मला
वाटतेय त्यांच्या एकटेपणाला सुखकारक होतेय. Physically सारखे फिरायला/ trip ला
जाणे शक्य नाही, वाचणे शक्य नाही, कोणाकडे जाणे शक्य नाही किंवा बोलावणे शक्य नाही
त्यामुळे TV त्यांचे मानसीक स्वास्थ्य जपायचे काम करतोय.
TV च्या channels च्या संख्या वाढीमुळे employibility वाढली हेही मान्य करावे
लागेल. Actors/
Directors/ Technicians/ makeup artist/ singers/choreographers ह्या सगळ्यांना chance मिळाला. Singing/ dancing/cooking/quiz/ adventure अश्या विविध reality TV shows मुळे अनेक गुणी
कलाकारांचा शोध लागला. कार्यक्रमात भाग घेणारा सामान्य माणूस घराघरात पोचला व
celebrity होऊ लागला. घरात बसून voteकरून आपल्या आवडत्या कलाकाराला जिंकवून देता
यायला लागले.
Supermarket मध्ये गेल्यावर जसे आपण खिशाला/आवडीला व गरज म्हणून आपण खरेदी
करतो त्याप्रमाणे TV पहायाचाही निर्णय सर्वस्वी personal. किती वेळ पाहायचे / काय
पाहायचे व कधी पाहायचे हा निर्णय सर्वस्वी personal. भारतात अजूनतरी बहुतांश घरी
TV एकत्र पहायची पद्धत आहे. पण हे चित्र लांब नाही जेव्हा घरातील प्रत्तेकासाठी
वेगळा TV असेल कारण प्रत्येकाची आवड वेगळी व स्वातंत्र्याची कल्पना वेगळी.
Subscribe to:
Posts (Atom)