प्रत्येक नाण्याला नेहमी दोन बाजू असतात, मी फक्त एकच (चांगली)बाजू ह्या लेखात
मांडायचा प्रयत्न करणार आहे.
मला आठवतेय मी ५-६ वी मध्ये असेन. आम्ही जवळजवळ २५-३० मुले-मुली मिळून
खेळायचो. एके दिवशी एका मुलीने वार्ता आणली की देशपांडेंच्या घरी दूरदर्शन आला आणि
मग काय आमची सगळी झुंड गेली त्यांच्या घरी. त्यांच्या घराला एखाद्या लग्नघराचे
स्वरूप आले होते. केवढे लोक TV पाहायला आले होते.तो काळ होता १९८०-८२ च्या सुमारास
black and white TVचा आणी फक्त एकुलत्या एक channelचा. अगदी " आमची माती आमची
माणसे" हा कार्यक्रमही आवडीने पाहण्याचा. चित्रहार व छायागीत ची आठवडाभर वाट
पाहण्याचा. सगळ्याच कार्यक्रमांचा दर्जा उत्तम होता. देशपांडे चे कौतुक करावे
तितके थोडे कारण सगळ्यांना आवडीने व आनंदाने बोलावयाचे ते. त्यांचा मुलगा तर
हल्लीच्या भाषेत "भाई" झाला होता. TV पाहायला मिळेल म्हणून सगळे त्याचे
ऐकायचे.
Information Age
हळूहळू घरी-घरटी TVयायला लागले. आमच्याही घरी १९८४-८५ च्या सुमारास b/w TV आला.
त्या सुमारास एकसे बढकर एक कार्यक्रमांची रेलचेल होती. तो जमाना होता रामानंद सागर
यांच्या " रामायण" चा, गोविंद निहलानी यांच्या " तपास" चा
किंवा बुनियाद, हमलोग व खानदान अश्या उत्तम serials चा. रविवारी सकाळी रामायण चालू
झाले कि रस्तावर शुकशुकाट असायचा. आज्यातर TV ला नमस्कार करून बसायच्या. त्या काळात
TV चा रोल pure information होता. TV हा कुतूहलाचा विषय झाला होता व घरात
TV असणे status symbol :)
Enterntainment Age
त्यानंतर TV colour झाला. Channels वाढले/ कार्यक्रमही वाढले. १९९६-९७ च्या
Z-TV ने धुमाकूळ घालायला चालू केले.तेंव्हा परदेशातही आपला TV पाहता येवू लागला.
Serials ची संख्या वाढली.कार्यक्रमाचा दर्जा उत्तम होता. नंतर २००० मध्ये 'एकता
कपूर ' ह्या धूमकेतूने ह्यात प्रवेश केला आणी सगळे चित्रच बदलले. channels ची
संख्या वाढली. लहान व तरुण वर्गाबरोबर 'housewife' वर्गही पूर्ण capture झाला.'
सास-बहु saga' चालू झाला. २४ तास TV चालू झाला. बघा किती बघायचा तो. TV che Music / News / Entertainment / Movies
/ Knowledge/ cartoon channels असे वर्गीकरण झाले.
Reality TV Age
त्यानंतर सगळ्या regional language channels चे पेव फुटले.मराठी मध्ये ही १० channels सुरु झाले. मराठी मध्ये हि Music /
News / Entertainment / Movies / Knowledge असे प्रकार आले. आणी अजून एक वर्ग senior citizens चा त्यात addict झाला. आज कित्येक घरात एक-एकटे
आजी व आजोबा किंवा दोघेच राहतात. मुले दुसऱ्याघरी/गावी/देशी राहतात. अश्या सगळ्या
आजीआजोबांचा TV हा सोबती झाला. TV serials मध्ये / कार्यक्रमामध्ये काय चाललेय
ह्याचा मानसिक परिणाम ह्या group वर होणार नसला तरी घरात कोणीतरी आहे ही भावना मला
वाटतेय त्यांच्या एकटेपणाला सुखकारक होतेय. Physically सारखे फिरायला/ trip ला
जाणे शक्य नाही, वाचणे शक्य नाही, कोणाकडे जाणे शक्य नाही किंवा बोलावणे शक्य नाही
त्यामुळे TV त्यांचे मानसीक स्वास्थ्य जपायचे काम करतोय.
TV च्या channels च्या संख्या वाढीमुळे employibility वाढली हेही मान्य करावे
लागेल. Actors/
Directors/ Technicians/ makeup artist/ singers/choreographers ह्या सगळ्यांना chance मिळाला. Singing/ dancing/cooking/quiz/ adventure अश्या विविध reality TV shows मुळे अनेक गुणी
कलाकारांचा शोध लागला. कार्यक्रमात भाग घेणारा सामान्य माणूस घराघरात पोचला व
celebrity होऊ लागला. घरात बसून voteकरून आपल्या आवडत्या कलाकाराला जिंकवून देता
यायला लागले.
Supermarket मध्ये गेल्यावर जसे आपण खिशाला/आवडीला व गरज म्हणून आपण खरेदी
करतो त्याप्रमाणे TV पहायाचाही निर्णय सर्वस्वी personal. किती वेळ पाहायचे / काय
पाहायचे व कधी पाहायचे हा निर्णय सर्वस्वी personal. भारतात अजूनतरी बहुतांश घरी
TV एकत्र पहायची पद्धत आहे. पण हे चित्र लांब नाही जेव्हा घरातील प्रत्तेकासाठी
वेगळा TV असेल कारण प्रत्येकाची आवड वेगळी व स्वातंत्र्याची कल्पना वेगळी.
No comments:
Post a Comment