Sunday, 15 December 2013

कोऽहम्

बाळ गोडूले, बाळ सोनुले
बाळ छकुले, बाळ तान्हुले                       ( कोऽहम् )

मुलगी झाली झाली मुलगी, पहिली बेटी, पेटी धनाची
नात आमची लाडाची, नात मालतीगोविंदांची         ( कोऽहम् )

कन्या जरी परधन, लाडाकोडानी वाढवायची
काळजाचा तुकडा , कन्या मनीषाकुमारांची          ( कोऽहम् )

 स्नुषा म्हणजे दुसरी मुलगी, प्रेमाने-हौसेने स्वीकारायची
आमची मंजिरी, स्नुषा विजयाश्रीकांताची             ( कोऽहम् )

भार्या म्हणजे सहधर्मचारिणी, सखीसोबती आनंद-दुःखाची
वेडुली मैत्रीण, भार्या विवेकाची                    ( कोऽहम् )

माता तरी  Friend, philosopher - guide वाटायची
आई माझी सबकुछ,  माता ओमकाराची            ( कोऽहम् )

कन्या-स्नुषा-भार्या-माता तरी, मी नाही कोणाची
सगळे जरी माझे तरी, मी नाही कोणाची
एकटी मी तरी, प्रवास जन्मोजन्माचा
प्रवास मला उन्नत करण्याचा, प्रवास माझ्या मुक्तीचा ( सोऽहम् )


No comments:

Post a Comment