Sunday, 15 December 2013

प्रवास मुक्तीचा

प्रवास जन्मोजन्मीचा,  असे जरी हर व्यक्तीचा |
तरीही असेल वेगवेगळा,  प्रवास मुक्तीचा ||

नरदेह असे अति दुर्मिळ, पुरुषार्थ साधावा बुद्धीचा |
स्वतःच कर तू उद्धार स्वतःचा, सुरु कर प्रवास मुक्तीचा ||

चंचल जरी मन तरी, कर अभ्यास योगाचा |
सोहं साधना करेल सोपी, प्रवास मुक्तीचा ||

भगवंतानी दिले आश्वासन, व्यर्थ न जाई अभ्यास विवेक वैराग्याचा |
ठेऊनी विश्वास त्यावर, चालू ठेव प्रवास मुक्तीचा ||

संतानी सांगितलेला मार्ग अवलंब, ज्ञान-कर्म-भक्तीचा |
सुखकारक होईल मग प्रवास मुक्तीचा ||

संचिताचे होईल ज्ञान, प्रारब्धासाठी भाव भक्तीचा |
क्रियमाणाचे निष्काम कर्म संपवेल मग प्रवास मुक्तीचा ||

1 comment: