Monday, 28 April 2014

झालासी भक्ताचा देव तू

बरेच महिन्यापूर्वी माझ्या वाचण्यात एक लेख आला. त्यात हे लिहिले होते

" Each one of us is potential Hanuman and can find ways of changing destiny with our mind-actions-words. We can face challenges with ease. When Hanuman is awakened within life is experianced as one illuminated stretch of being where there is unlimited strength, power and purpose."

मी हे जेंव्हापासून वाचले तेव्हापासून माझ्या मनात "हनुमान" हा विषय घोळत होता. मला हि कल्पना फार आवडली. आपण जेव्हा हनुमानाची प्रार्थना करतो तेव्हा आपणही आपल्या आतील उर्जा-शक्ती (हनुमान) जागे किंवा उद्दीपित करत असतो. खरतर हनुमान वानर कुळातजन्मला असल्यामुळे स्वतःला सामान्य समजत होता. त्याला त्याच्या सामर्थ्याची कल्पना नव्हती. पण जेव्हा त्याची श्रीरामाची भेट झाली तेंव्हा त्याला त्याच्या जीवनाचे उद्दिष्ट समजले. आपले मनही वानरासारखे निरर्थक उड्या मारीत असते. जेव्हा गुरूची भेट होते तेंव्हा आपल्याला आपल्या मनाच्या सामर्थ्याची जाणीव होते. रामाची भक्ती करता करता हनुमान इतका मोठा झाला की लोक त्याला देव म्हणून पूजू लागले.ह्याच संदर्भात मला सुचलेल्या काही ओळी..........

हे भगवंता हे हनुमंता
झालासी भक्ताचा देव तू ||

बुद्धिमत्तेचा सागर तू
चौदा कलांचा स्वामी तू
अष्टसिद्धी योगी तू ||१||

सामर्थ्याचा अविष्कार तू
महातपस्वी योद्धा तू
पराक्रमाची परिसीमा तू ||२||

रुद्रांचाही रुद्र तू
बलवंत असा योगी तू
असीम श्रद्धेचे भांडार तू ||३||

सूक्ष्माहुनी सूक्ष्म तू
ब्रम्हांडहूनी मोठा तू
मनापेक्षाही चपळ तू ||४||

आदर्श असा साधक तू
सेवा व शक्तीचे प्रतिक तू
रामभक्तीचा उच्चांक तू ||५||

हे भगवंता हे हनुमंता
झालासी भक्ताचा देव तू
एकच मागणे असे तुजपाशी
कर जागृत माझ्यातील हनुमंत तू
कर जागृत माझ्यातील हनुमंत तू||

No comments:

Post a Comment