Wednesday, 7 May 2014

Diet

आजकाल कुठेही जावा, गप्पांमध्ये खाणे हा सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय असतोच. आणी पूर्वी आपण किती व कसे खायचो आणी आता काय आणी किती खातो ह्याही गप्पा चवीने मारल्या जातात. कमी खाणे हे हल्ली काही घरात ठरवून तर काही घरात इलाज नाही म्हणून केले जातेय,  ह्याच संदर्भातून सुचलेले हे विडंबन ..........
( खालील ओळी दिवस तुझे हे फुलायचे ह्याच्या चालीत म्हणाव्यात)
दिवस तुझे हे वाळायचे,
मोजून मापून जेवायचे ||

वजन वाढते फार
सोसेना पायाला भार
कळेना काय ते करायचे ||१||

रोज सकाळी सकाळी
चहाची हुक्कीही भारी
पाण्यात मध-लिंबू पिळायचे ||२||

ब्रेड-बटर, अंडी चार
पण cholesterol वाढवी फार
दुधात मध-ओट ओतायचे ||३||

पराठे अन तुपाची धार
पण कॅलरीज वाढवी फार
पोटात काकडी-tomato भरायचे ||४||

४ ची वेळ वडापाव-चहाची
पण  dietician चे ऐकायची
पाण्याबरोबर मारी बिस्कीट ढकलायचे ||५||

रात्रीची वेळ निवांत चोपायची
पण हल्ली नाही परवडायची
वाळक्या फुलक्यावर भागवायचे ||६||

No comments:

Post a Comment