नुकतीच बातमी वाचली की नवीन serial येतीय - महाभारत आणी त्याचे budget आहे १ ० ० करोड . ऐकून वेडलागायची वेळ आली . कुतूहल म्हणून मी ती serial पहिली की काय आहे ह्यात शंभर करोड चे , तेंव्हा भव्य
locations , भव्य सेट दिसले पण त्याबरोबर अजून एक गोष्ट notice केली ती म्हणजे दागिन्यांचा प्रचंड वापर.
सगळ्यात पहिला विचार मनात आला की एवढे दागिने घालून हे लोक चालू बोलू व वावरू कसे शकतात? ७-८ किलो वजन त्याचे नक्कीच असेल.
दागिन्यांचे व भारतीयांचे नाते युगायुगांचे आहे. सोन्याचे,चांदीचे,मोत्याचे,हिऱ्याचे आणी माणिकपाचूचे असे
अनेक प्रकारचे किमती दागिने घालण्याची प्रथा आहे. कुतूहल म्हणून मी दागिन्यांची नावे आठवायला लागले तर यादी पाहून थक्क व्हायला झाले. अगदी फक्त महाराष्ट्रीयन , सोन्याचे व फक्त बायकांचे दागिने
विचारात घेतले तरी एवढे प्रकार आहेत.
गळ्यातील: मंगळसूत्र , साखळी , सर ,मोहनमाळ , पोहेहार, पुतळेहार, ठुशी,
कोल्हापुरी साज, चिंचपेटी, जोंधळेहार, लक्ष्मीहार,वज्रटिक , सुर्यहर , चंद्रहार , चपलाहार, तन्मणी, गोफ
कानातील : कुड्या, भोकर , रिंगा , वेल , कान, झुबे , बुगडी
हातातील: पाटल्या , बांगड्या, तोडे, गोठ , बाजूबंद , वाकी , अंगठी
पायातील: पैंजण, तोरड्या , वाळे , चाळ , जोडवी , मासोळी , बिरोड्या
कमरेवरील: कंबरपट्टा, मेखला , छल्ला
नाकातील: नथनी , नथ , चमकी व मोरनी
खरेतर आता एवढे दागिने कुणाकडे असणे शक्य नाही व असतील तरी ती कुठे घालून जाण्याची सोय राहिलेली नाही. पण ही यादी आपल्याला आपल्या वैभवशाली इतिहासाची व परंपरेची आठवण नक्की करून देईल ही आशा !!
Do
send names if you know anything which I missed.
आमच्या गोव्यात आज देखील प्रतिष्ठीत सारस्वत घरातील स्त्रिया खालील दागिने वापरतात ...खास करून घरच्या कार्याच्या वेळी ...गळ्यात गीजबिजलें , वज्रां (हिऱ्यांचा) हार,तन्मणी ,सोन्याच्या मण्यांच्या माळा,
ReplyDeleteनवरत्नां हार ,लक्ष्मी हार , चपलाहार , केसात सोन्याची फुलं,सोन्याच्या /हिर्याच्या हेअर पिन्स ,पिसोळी , चांद,अम्बlड्याला सोन्याची जाळी, चाफ्या आटी (वेणी ),मोगऱ्या आटी ,हातात काकणा , पिद्दुकांची काकणा ,मोत्यांची काकणा ,वज्राची /पाचूची/माणकांची तोडे ,काकणा ,पोवळ्यांची काकणा,दोट्टी (डबल ) गोठ, पाटली ,उलट पाटली,..दंडात बाजूबंद ,वाकी ,नाग .कंबर पट्टा,सोन्याचा घोस (चाव्या लावायचा),अंगठ्या .साडी पिन ,पदराला लावायची पिन
तसेच पुरुष सरपळ्यो (साखळ्या ),अंगठ्या ,माश्कोत (ब्रेसलेट ),कडी,शर्टची बटणे ,टाय पिन ,घड्याळाचा सोन्याचा पट्टा वगैरे वापरतात.