आतापर्यंत कुत्रे चावल्यावर १४ injections घ्यावी लागतात ह्या
मौलिक माहितीपेक्षा कुत्र्याबद्दल काहीही माहिती नसणारी मी कुत्र्यावर लेख लिहीन
असे स्वप्नातही वाटले नव्हते. माझ्या माहेरच्या व सासरच्या ७ पिढ्यात कुणीही
कुत्रे पाळले नव्हते व तसे करायची माझी व माझा नवरा यांची इच्छ्या नव्हती. पण
म्हणतात न कधी / कसे / काय घडेल हे त्याच्या हातात असते आणी झालेही
तसेच...........
ओंकारने २-४ वर्षे प्रेमाने/ रागावून/चिडून/वैतागून
DOG PET पाहिजे म्हणून हट्ट करून पहिले. पण ते शक्य नाही म्हणून मीही २-४ वर्षे
नकार देत राहिले. मी का कुत्रा? असा ultimatum ही दिला. त्यामुळे ओंकारने १ वर्ष FISH PET म्हणून
निभावून नेले. एक चे दोन करताकरता २० फिश चा tank घरी आला. पण त्यांचा काहीही
response नसल्यामुळे ओंकार त्यात रमला नाही व परत DOG साठी हट्ट चालू झाला. DOG
आणलास तर त्याचे मी सगळे करीन व परत
आयुष्यात कधीही हट्ट करणार नाही असे मला कबूल करून १९ फेब्रुवारी २०११ ला Doggie आमच्या घरी आला.
१-२ महिने कुठला breed आणायचं ह्यावर अभ्यास
झाला व सर्वानुमते labrador आणायचे ठरले. DOG ची हि वंशावळ (घराणे) असते व तो
घेताना ह्या गोष्टीला खूप महत्व असते व त्याची किंमत ठरते. असे सगळे पाहून आजोबा
अमेरिकन व आजी कडचे ऑस्ट्रेलिअन असे good pedigree असलेला LUCKY घरी आला. बरेच
Puppy झोपाळू आहे / जाड आहे / मठ्ठ आहे / ओरडतोय अश्या सबबीवरून आम्ही reject केले
व जो active होता/ हुशार दिसत होता व शांत आणी जगन्मित्र वाटत होता असा LUCKY
आमच्या घरी आला.
Doggie घरी आणायचा म्हणून भरपूर थेओरोतिकल
अभ्यास करून,ओळखींच्या लोकांबरोबर बोलून आम्ही तिघे श्वानसेवेकरता सज्ज झालो.
सर्वानुमते त्याचे नामकरण झाले. आणी पठ्ठ्या नावाप्रमाणे LUCKY आहे याची प्रचीती
यायला लागली कारण त्यांनी तोंड उघडायच्या आत ३ माणसे धावून जायला लागली. ३ parents
मिळाले त्याला. आणी आज दिवसभर lucku ने काय केले व काय केले नाही अश्या चर्चा
संध्याकाळी रंगायला लागल्या. लकीने काय खाल्ले, शिशू कितीवेळा केली ह्याचा count
ठेवला जावू लागला. लकी झोपला कि नाही / किती वेळ? / का झोपला नाही ह्यावर
चिंतासेशन होऊ लागले.
हौसेला मोल नाही ह्याचा अर्थ बन्गलोरे मध्ये
असलेल्या डॉगकरता सेवासुविधा पाहून कळतो. त्यांच्याकरता pet house आहेत / स्पा
आहेत / पार्लर आहेत/ त्यांचेही haircut / manicure / pedicure होते. रेस्तौरान्त्स
/ bakery / toys आहेत / त्याचेही बर्थडे पार्टी arrange होतात. return गिफ्ट्स हि
मिळतात. one day ओउतिंग arrange करता येते. त्यांना emotional problems येवू नयेत म्हणून डॉक्टर आहेत. त्यांचाही वेट
लॉस प्रोग्राम असतो / जिम असते / vitamins
/minerals/sugar/BP control ठेवण्याकरता रेगुलर visit
कराव्या लागतात.
श्वानायान पुढे चालू
......................................................................................
Very true. I can understand your mixed feelings. Keep up writing.
ReplyDeleteNice lekh.. manapasun lihila aahes....
ReplyDeleteThanks Nulkar Kaka and Gandhali :)
ReplyDelete