Thursday, 10 October 2013

भाग्याची गोष्ट


गेल्या काही दिवसापुर्वीची गोष्ट
माझ्या कामवालीने माझ्याकडे दहाहजार रुपयाची demand केली (असे मधे-मधे छोटे-मोठे धक्के ती देतच असते. प्रत्येकवेळी कारण वेगळी असतात)
ती: दीदी १०,००० चाहिये, मेरे salary मे से काट लेना!
मी: ३ महिने पहेले लिये थे ना फिरसे क्यू चाहिए?
ती: दीदी सबने हा बोला है! मै किसीसे १०,००० और किसीसे २०,००० ले रही हू....... तुम तो २०,००० दोगी नही, इसलिये १०,००० मांग रही हुं
मी:  पर क्यू चाहिए इतने सारे पैसे?
(मनात - काय बाई आहे - माझ्या तोंडावर, माझ्याच घरात उद्धटपणा करते.......पैसे मागते कि order करतेय )
ती: दीदी, husband ने बोला है और TV पे दिखाया की सोने का भाव कम हो गया है......तो आजही सबसे पैसे लेके(एक लाख रुपये) उसका सोना लूंगी....कल भाव फिर बढेगा तो problem होगा .... सोना बाद मे काम आयेगा....मै saving नही करती ना?
मी: :(   :O    :^)    (think)  (shake)   :|
असे जेवढे emoticon शक्य असतील तेवढी expressions दिली. एकाच वेळी तिच्या समाझदारीचे/ शहाणपणाचे कौतुक करावे/ मूर्खपणाबद्दल ओरडावे/सारखे पैसे मागते म्हणून रागवावे कि सगळ्यांकडून पैसे घेऊन नंतर पगाराचे काय करणार असे अनेक विचार माझ्या मनात येऊन गेले.
जेंव्हा मी हे नवऱ्याला सांगितले तेंव्हा त्याचेही अजून एक lecture ऐकावे लागले की ती अशिक्षीत बाई येवढा मार्केट condition चा विचार करून proactively decision घेतीय आणी तू?
परत एकदा सगळे emoticons........... :(   :O    :^)    (think)  (shake)   :|
आणी माझी विचारचक्र जोरात फिरू लागली ....आजकालच्या service provider बद्दल ......worker क्लास बद्दल.....maids बद्दल.
पूर्वी आमच्या घरी जी कामवाली होती तिचे जग म्हणजे माझी आई. आई जे काही सांगेल ते ती ऐकायची. फारसे स्वतःचे डोके वापरायची नाही.नवरा दारू पितो म्हणून काम करायची वेळ आली होती तिच्यावर. माझ्या आईने तिला खूप मदत केली होती. शिक्षण अजिबात नाही त्यामुळे व्यवहार कळत नव्हता कि वागायचे कसे? माझ्या आईने तिला सगळे शिकवले. जशी आमची परिस्थिती बदलत गेली तशी तिचीही. तिच्या मुलीही आमची पुस्तके/कपडे वापरून मोठ्या झाल्या. अन्न/कपडे/वस्तू घेऊन जायला त्यांना कमीपणाचे वाटायचे नाही. ज्यांच्या घरी काम करतो ती लोक वेगळी आहेत, त्यांच्या सारखे आपले असावे हि इच्छ्याही नव्हती व महत्वकांक्षाही. असेच चित्र जवळपास सगळ्यांच्या कामवाल्यांचे होते.
पण परिस्थिती हळूहळू बदलली आणी आता फार वेगाने बदलतीय. बहुतेक मोठ्या शहरातील कामवाल्यांची पहिली पिढी थोडीफार शिकली, त्यांच्याकडे पैसा खेळू लागला. शिक्षणाबरोबर व सुविधाबरोबर त्यांची मानसिकताही बदलली. त्यांच्या इच्छ्या-आकांक्षा वाढल्या. TV घरी आल्यामुळे खूप गोष्टी कळू लागल्या. त्यांचेही मान-अपमान वाढले. आता त्यांना अन्न/कपडे/वस्तू दिलेल्या आवडत नाहीत. अगदी नवीन गोष्टी दिल्या तरी फारशी ख़ुशी नसते. कामाचा दर्जा व आपलेपणा कमी झाला पण अपेक्षा भरपूर वाढल्या. त्यानाही sunday ला सुट्टी हवी असते विश्रांतीकरता. माझी कामवाली मुलांना सुट्टीत फिरायला घेऊन जाते. मागच्या वर्षीच आमच्या सगळ्यांच्या कडून पैसे उधार घेऊन तिने गावाकडे plot घेतला.......आता सोने घेतेय. ती सकाळी ६ ते १ व ३ ते ९ अशी जवळजवळ १३-१४ तास काम करते म्हणून तिच्या मुलाला सांभाळायला व तिच्या घराचे काम करायला गावाकडून एक fulltime मुलगी घेऊन आलीय.
परत एकदा........... :(   :O    :^)    (think)  (shake)   :|
पण हे सगळे ती करतेय कारण तिला माहित आहे सगळ्या दीदी तिच्यावर इतक्या अवलंबून आहेत. दीदींच्या घराची गाडी तिच्यामुळे सुरळीत चाललीय. आजकालच्या जॉब-घर-मुले व हेक्टिक lifestyle मुळे सगळ्या दीदीही तिच्यावर अवलंबून आहेत. त्यामुळे सध्याची हि नवीन म्हण आहे
Behind every successful women there is good maid.
आणी ही good maid मिळणे ही अगदी भाग्याची गोष्ट झालीय.मागच्या जन्मी नक्की काहीतरी पुण्य केलं म्हणून चांगली कामवाली मिळाली असे म्हणायला हरकत नाही.

4 comments:

  1. Chan aahe.....Interesting!!! Keep it up!

    ReplyDelete
  2. It is SO SO TRUE - conincidentally - last weekend - my maid asked me for 10000 for the same purpose - she said she has 2 girls so now she can buy something small in Gold for them!!! Eariler she had asked me for money for a bed in her room - said she was getting a "custom" bed built...and i was so surprised.... :) :) Changes for good and yes "Didi chi gharchi gaadi tichya shivay naahi chaalat - te tila mahit aahe :)"

    ReplyDelete