माझ्या मुलाच्या वाढदिवसाकरता planning चालले होते.
त्यांनी ठरवले की अगदी जवळच्या ७-८ जणांना तो बोलावणार आहे.त्यांना चित्रपट
पाहायचा असल्यामुळे घरीच लंच करायचे ठरले. मला ऐवढे सांगून तो आपल्या कामाला गेला
की, everyone including himself will
prefer Chinese food. माझ्या डोक्यात काय करायचे त्याचे चक्र चालू झाले. व्हेज
चायनीज लंच म्हणून मग मी Fried rice /
Hakka noodles/Gobi Manchurian / Soup असे main course ठरवले आणी starters म्हणून Popcorn/ Cake and Chilli potatoes. वाढत्या वयाची मुले व जेवायची वेळ असल्यामुळे हा मेनू
perfect आहे असे माझे मत होते. मेनू ऐकून तोही खुश होईल म्हणून मी लगेच सांगायला
गेले, तर त्याचा response
" येवढेच"
मी म्हणाले अरे व्हेज चायनीज लंचमध्ये अजून काय
करणार? हे हेल्दी आणी पोटभर दोन्ही आहे, माझ्यातील आई जागी झाली.त्याच्यातील हि teenage मुलगा जागा
झाला,म्हणाला, Unlimited buffet मध्ये किती पदार्थ असतात. मग मीही अरे हे घर आहे, हॉटेल
नाही असे सुनावले. आणी मग जशी teenager मुलांची आणी आयांची जुंपते तशी आमचीही
जुंपली. पण दिवसभर Unlimited buffet हा शब्द डोक्यात
घुमत होता.
अमर्याद स्वेच्छ्या भोजन म्हणजे आपण मराठीत
ज्याला Unlimited buffet म्हणतो तो सध्या बोकाळलाय. कुठल्याही restaurant मध्ये जावा South / North / Italian / Mexican / Lebanese /
Gujarati/ Rajasthani / Kerala सगळीकडे बुफे जास्त करून
पाहायला मिळतो. लोकही हल्ली हेच prefer करतात मग restaurant वाल्यांचे काय जातेय?
Unlimited buffet म्हणजे ७-८ प्रकारची starters/ soups/ 10 course main course/ दहा प्रकारची deserts
असा प्रचंड spread असतो. एक-दोन महिन्यापूर्वी आम्ही डिनर ला गेलो
होतो, तो spread येवढा spread करून ठेवला होता की डिशेस भरून आणेपर्यंत दमछाक व्हावी व
परत भूक लागावी. मी नवऱ्याला म्हणाले आपल्याला गायीसारखी ४ पोटे नाहीत, एकच पोट
किती खाणार?
तो नॉर्थ इंडिअन बुफे होता, ७-८ प्रकारची लोणची,
असंख्य प्रकारचे पापड, चटण्या, सलाड चे बरेच प्रकार, ७-८ प्रकारची starters, २-३ प्रकारची soups, ५-६ प्रकारच्या भाज्या, ४ प्रकारचा भात, नूडल्स, थाई करी,
तुम्हाला कुठल्या प्रकारची रोटी पाहिजे तसे ते आणून देणार, सगळ्याची taste हवी
असेल तर तसे आणी दहा- बारा प्रकारची deserts
हा---------------------------------- अक्षरशः
लिहितानाही दम लागला. बर हे फक्त व्हेज वाल्यांसाठी.
प्रत्येक पदार्थाचा एक घास खायचा म्हणाले तरी ४
पोटे लागतील. बर प्रत्येकवेळी
डिश बदलायची, हि गोष्ट माझ्या जीवावर येते, किती काम वाढवतो आपण सगळ्यांचे. आणी
येवढा स्प्रेड म्हणून पैसेही भरपूर. तुम्ही खावा न खावा त्यांनी मेहनत तर
घेतलीय. पण म्हणतात ना ही किंमत आपण मोजतो ते काही क्षण तुम्हाला राजासारखे वागवले
जाते. You spent some time like King. काय पाहिजे ते मिळेल मागून तर बघा. एवढे सगळे असूनसुद्धा
काहीतरी विचित्र मागणारे लोकही मी पाहिलेत. १०० पदार्थ समोर असताना पण मला तेच
पाहिजे किंवा हे का नाही अशी हुज्जत घालणारे लोक पाहिलेत.
अगदी भारतीय - महाराष्ट्रीयन सर्व सामन्याच्या
घराचा विचार केला तरी उजवीकडचे / डावीकडचे असे ७-८ पदार्थ असायचेच. चटणी /
कोशिंबीर / उसळ /भाजी / आमटी / पोळी / भात /ताक असा रोजचा मेनू असायचा सणाच्या दिवशी
कडी-वडा / तळण / मसालेभात / गोड पदार्थ असा भरगच्च मेनू असायचा. पूर्वी सगळ्या
बायका व पुरुष यांना शारीरिक कष्ट इतके असायचे की येवढ्या अन्नाची गरज होती. खायची
व पचवायची ताकद होती. पण हळूहळू Automation
/ lifestyle मधल्या बदलामुळे शारीरिक
कष्ट कमी झाले आणी खाणेही.
आजकाल तर एकीकडे लोक diet करताना दिसतात म्हणजे ऐक
पेढा खायचा असेल तर २ फेऱ्या जास्त किंवा १० मिनिटे व्यायाम जास्त करायचे असे चालू
असते तर दुसरीकडे हे Unlimited buffet प्रकरण. हल्ली
सगळ्या ऑफिस मधल्या पार्ट्या अशाच असतात. आजकालच्या मुलानाही त्यामुळे घरीही आईने
एवढे पदार्थ करावेत अशी अपेक्षा असते.
पूर्वी कुतूहल म्हणून, नाविन्य म्हणून बुफे
चांगला वाटायचा पण हल्ली ना खिशाला ना वयाला ना पोटाला तो परवडतोय!! कारण एकतर
एवढे पैसे द्यायचे, पैसे दिले म्हणून नको इतके खायचे, जास्त खाल्ल्यामुळे आठवडाभर मेहनत
केलेली वाया घालवायची, एक दिवस जास्त खाल्यामुळे दिवसभर अजगरासारखे लोळत पडायचे आणी
त्रास सहन करायचा त्यापेक्षा नको तो Unlimited
buffet!!!!!
(Unlimited
buffet करता मराठी शब्द अमर्याद स्वेच्छ्या भोजन सुचवल्याबद्दल
सौ वृषाली फडके यांचे आभार)
Wow wahini!! Tu itka mast lihites pan he mahitich navta... mast!! :)
ReplyDeleteThank you dear Rashmi :)
ReplyDelete