हल्ली मी स्वतःपुरती चित्रपट theater ला जाऊन पाहायचा नाही अशी प्रतिज्ञा केलीय. माझे म्हणणे असे की (बाकीच्यांनी काहीही करावे माझा आक्षेप नाही) हल्ली असे(लायक) चित्रपट लागत नाहीत व दुसरे म्हणजे २-३ आठवड्यात चित्रपट कितीही करोडचा असला तरी टीव्हीवर येतो. त्यामुळे बघायचा, बघायचा नाही, फ्री आहे म्हणून बघायचा, फ्री आहे म्हणून बघायचा नाही, थोडा पहायचा, इंटर्वल पर्यंत पहायचा, जेवता जेवता पहायचा अश्या असंख्य शक्यता असतात व स्वातंत्र्य असते. बर Zee TV वरचा ह्या Sunday चा नाही जमला तरी लगेच Sony वर असतोच. दोन्ही जरी हुकले तरी नो tension, परत Zee TV वर दाखवतात. कितीही ठरवले नाही पाहायचा तरी ते दाखवत राहतात.
असो नमनाला घडाभर तेल झाले......आता point च्या मुद्यावर येते.
जवळजवळ गेले वर्षभर SRK, DP आणि RS यांचा चित्रपट येणार अशी धूम होती. SRK व RS हे पहिल्यांदाच एकत्र येणार त्यामुळे उत्सुकता अगदी शिगेला पोचली होती. गाणी बघून-बघून जवळजवळ चित्रपट कसा काय असणार हे कळले होते तरीही सर्वजण FRIDAY ची वाट पाहत होते आणि एकदाचा तो आला. माझ्या असंख्य प्रतिज्ञांमुळे कावलेल्या माझ्या घरच्या लोकांनी प्रतिज्ञा केली की आता TV वर येणारा 'चेन्नई एक्सप्रेस' सोडायचा नाही व तो मलाही पहायला लावायचा. त्यामुळे आम्ही सर्वजण जय्यत तयारी करून बसलो. स्वयंपाक / जेवण सगळे उरकून बसलो (उगीच disturb नको) लकीचे सगळे कार्यक्रम आटोपले(उगीच disturb नको) सगळे फोन switch off (उगीच disturb नको) असो. आपापल्या जागा पकडल्या- उजवीकडे coke, डावीकडे popcorn अशी सगळी जय्यत तयारी झाली. (उगीच disturb नको)
आणी तोच तो क्षण, तीच ती वेळ आली ..........
पहिली १० मिनिटे झाली, आपण नक्की काय पाहत आहोत असे वाटत असतानाच Advertisement break ची वेळ झाली...आणि कधी नव्हे ते मला आनंद झाला. मी हल्लीच्या adv. च्या creativity ची दाद दिली. १-२ मिनिटे करता करता १० मिनिटे झाली. परत चित्रपट सुरु झाला. हा चित्रपट ना शाहरुख चा वाटत होता ना रोहित चा ...असे काही वाटे तोपर्यंत परत Advertisement break आणि परत........ आनंद .........परत creativity ची दाद .....१० मिनिटे झाली........ परत चित्रपट सुरु झाला. असा पुढचा जवळजवळ एक- दिड तास आम्ही जाहिराती पहिल्या व मधे मधे सहन होईल तेवढा चित्रपट पहिला. शेवटी कंटाळून दुसरा channel लावला तिकडेही तेच. असे बरेच channels बदलून शेवटी बातम्या लावल्या तर तिकडे
" तुम्ही कुठेही जाऊ नका.....आम्ही अजून ब्रेंकिंग न्यूज घेऊन परत येतोय थोड्याश्या विश्रांतीनंतर"
बातम्या मध्ये सुद्धा ब्रेक?????
हल्ली serials/ movies / न्यूज च्या मध्ये ब्रेक न होता ब्रेक च्या मधून मधून कार्यक्रम होऊ लागलेत. प्रत्येक कार्यक्रमाचे १०-१२ जाहिरातदार असतात त्यामुळे प्रत्येकाची एकदा जाहिरात दाखवली तरी १०-१५ मिनिटाचा ब्रेक ठरलेला असतो. हल्ली मी त्याचा त्रास करून न घेता व त्यावर चर्चा- चर्वण न करता त्याचा आनंद घ्यायचा ठरवलंय. आणी खर सांगू मजा येतेय.
हल्ली जाहिराती कशाकशाच्या असतात. प्रचंड variety असते. प्रत्येक वर्गासाठी खास जाहिराती असतात. छोटा व तरुण वर्गासाठी जास्त. ह्या वर्गाना खेचून आणण्यासाठी प्रचंड डोके वापरलेले असते. काही जाहिराती सामाजिक भान जाणून केलेल्या असतात की ज्याची आपण वाट पाहतो. जसे Amul / Idea / Vodafone/ Tata Tea . तर काही तासभर विचार करून करून सुद्धा कळत नाही की नक्की ही कशाची जाहिरात होती. काहीही विषय नसलेल्या सेरीअल्स पाहण्यापेक्षा मला हल्ली जाहिराती पाहायला आवडायला लागलेय. काही सेकंदामध्ये एखादा विषय किती छान मांडता येतो व किती चांगल्या प्रकारे लोकांपर्यंत पोहोचवता येतो याचे उदाहरण म्हणजे जाहिराती. मनोरंजनाबरोबर माहितीही....हल्ली ज्याला infotainment म्हणतात ते. कुठलीही खरेदी करायच्या आधी mindset तयार करायचे काम जाहिराती करतात. किंवा काही अगदी instant connect होतात जसे Airtel - जो तेरा है मेरा / Cadbury - कूछ मिठा हो जाये / Surf - डाग अच्छे है / Fevistick - चुटकी मे चीपकाये / ५ स्टार - रमेश-सुरेश / Havells / Flipkart इत्यादी. कित्येक प्रोडक्ट्स लोक(मुले) जाहिराती चागल्या किंवा effective असतात म्हणून खरेदी करून पाहतात. सगळ्यात जास्त परिणाम बच्चे कंपनीवर होतो.....बरेचदा त्यांची डिमांड आईकडे अशीच असते जसे Adv. मध्ये आहे तसे आणून दे. Maggi noodles / Ice creams / Kurkure / Chips ह्यांचा तरी adv. मुळे प्रचंड सेल होतोय. मात्र Deodorant आणी पान मसाला च्या जाहिराती मात्र मूर्खपणाचे कळस वाटतात. मुलीना मुलांच्या मागे लागण्याचे एकच काम येत असल्यासारखे प्रत्येक जाहिराती मध्ये तेच. Irritating.
हल्ली मलाही advertisement best आहेत किंवा bokvas आहेत असे analyse करायला मजा येते. I am enjoying it....Don't underestimate power of Advertising....mind U!!!
No comments:
Post a Comment