Monday, 18 November 2013

भ्रमणध्वनी पुराण

||मोबाईल मंत्र बोला वाचे||
सध्या फोन (नुसता फोन नाही म्हणायचे - स्मार्ट फोन) हा सगळ्यांच्या आयुष्याचा अविभाज्य घटक बनला आहे. त्याचे गुण पाहता ते बरोबरही आहे पण फोन चा उपयोग हा फक्त convenience म्हणून न राहता आपण त्याच्या आहारी गेलोय. आजकाल प्रत्येकाच्या हातात फोन असतात व सारखे त्याबरोबर चाळे चाललेले असतात. कित्येकांना तर दर २ मिनिटांनी फोन पहायची सवय असते. समोर कितीही महत्वाचे बोलणे चाललेले असले तरी घडीघडी फोन तपासणे त्यांचे चालू असते. पूर्वी कधीकाळी सगळ्यांचे नंबर पाठ असायचे......पण हल्ली डोकेच चालत नाही......नशीब नावे तरी लक्षात राहतात अजून. कॅमेरा, फोनमध्ये असल्यामुळे हल्ली लोक कशाचाही फोटो काढत सुटतात....नुसत्या २ डोळ्यांनी कशाचाही आस्वाद घेतला तर शिक्षा होईल कदाचित. आजकालची तरुण पिढी बद्दल तर काही बोलूच नये. ४ सख्खे मित्र भेटले तरीही चौघे/चौघी फोन वर काहीतरी करत असतात, यदा कदाचित बोलत असतील तर फोन ( हे app/game download केले का वगैरे) बद्दलच बोलत असतात. ह्याच साधारण विषयावर काहीतरी सुचले म्हणून share करतेय.........

जिकडे पहावे तिकडे मोबाईल सर्वांच्या हाती |
त्याच्याविना अगदी चैन पडेना ||१||

मोबाईल फोन हल्लीसर्वांचा लाडका|
गळ्यातला ताईतझाला आहे||२||

नसेल जेवण चालेल तरीही| नसेल झोप हरकत नाही|
नसतील कपडे चालेल तरीही| पण मोबाईल हवा||३||

जितका मोठा फोन |तितका तुमचा रुबाब|
Apple आणी Samsung| असता बोलूच नये||४||

मोबाईल करतो आकडेमोडमोबाईल सांगतो वेळ|
मोबाईल सांगतो अलार्म मोबाईल खेळवतो खेळ (games) ||५||

माझे  तो घड्याळमाझी ती  डायरी|
माझा तो कॅमेरागुणी बाळ||६||

माझा तो आरसामाझा तो GPS|
माझा तो dictionary| पत्रकार माझा||७||

मला संदेश पोचवीमाझा संदेश पोचवी|
मला गाणी ऐकवीमित्र माझा||८||

आजकाल मजसीकाळ/वेळ/तारीख/दिवस|
मोबाईल सांगेआठवणीने||९||

माझा तो डोळामाझा तो कान|
माझे तो डोकेसर्वही असे||१०||

मोबाईल येवढा हुशारस्मार्ट म्हणती त्यासी|
त्याच्यावाचून हल्लीमाझे सगळेच अडे||११||

फोन स्मार्ट आहेत्यामुळे डोके माझे बंद|
सगळे काही तोचठरवतो हल्ली||१२||

फोन शिवाय चालेनाफोन शिवाय करमेना|
एक मिनिटहीउसंत मिळेना||१३||

५ मिनिटे जरी न वाजता फोनघालमेल जीवाची मन हैराण|
सखा तो २४ तासाचा | Sms, Application and Ringtone  ||१४||

मोबाईल खरे तर आपला सेवक| पण आपणच झालो दास त्याचे|
किमया ही मोठी असे विज्ञानाची| पण आपणच झालो आहे बाहुले त्याचे||१५||

No comments:

Post a Comment