Tuesday, 12 November 2013

कुंदनची फुले

मला नेहमीच कुंदन च्या रंगांचे आकर्षण वाटत आलेय. गेल्या काही वर्षापूर्वी पहिल्यांदा कुंदन दागिन्यांच्या रूपाने घरी आले. हल्ली कुंदन ची रांगोळी घराघरात पोचली. दागिने / रांगोळी / सजावट ह्या करता कुंदन वापरले जाऊ लागले. ह्या टिकल्या वेगवेगळ्या रंगात व आकारात मिळत असल्यामुळे खूपच गोष्टी करता येतात. रांगोळी चे बरेच प्रकार केल्यानंतर त्याची फुले कशी दिसतील ह्याबद्दल मला नेहमी उत्सुकता होती. नुकती मी ती करून ही पाहिली, खूप सुंदर दिसतात. पण ही फुले कशी वापरायची हा मोठा प्रश्न होता. ही फुले एकत्र बांधण्यासाठी वायर वापरली जाते त्यामुळे ती चिकटवायला खूप अवघड होते. मी कुन्दांचे काही प्रकार करून पहिले त्याचे काही फोटो......








No comments:

Post a Comment