ह्या ओळी माझ्या सगळ्या भाचरांसाठी......
(बालकविता लिहायचा हा माझा पहिलाच प्रयत्न - चूकभूल माफ करा :))
एके दिवशी म्हणाला चांदोबा आपल्या आईला
शिवून देग मला माझा लोकरीचा झबला ||
रात्रभर सतावतो वारा अन वाजते मला थंडी
आकाशाची सफर करायची पण भरते मला हुडहुडी
आजारी पडतो मी सारखा, हवा न मानवे मला
शिवून देग मला माझा लोकरीचा झबला ||१||
चांदोबाची व्यथा ऐकून आईस वाईट वाटले
काय करावे, कसे करावे हे तिस नाही कळले
एके दिवशी होसी छोटा अन एके दिवशी मोठा
सांग कसा शिवू मी तुला लोकरीचा झबला ||२||
सांग घेऊ माप मी छोटे-मोठे कुठले
की शिऊ मी तुला पंधरा लोकरीचे झबले?
ऐकून चांदोबा झाला खुश, म्हणे चालेल आई मला
शिवून देग मला माझा लोकरीचा झबला ||३||
प्रीय मंजिरी,
ReplyDeleteवैशाली कडून तुझा reference मिळाला. page खूप छान आहे. तुझी ही "मनातले" लिहिण्याची कल्पना खूप छान आहे. माला वाटले, आपणही काही लिहून पहावे. तू वाचून अभिप्राय कलावशील का?
अदिती. ( वैशाली सावकार ची बहीण)
Thanks Aditi. Surely I would love to help anyway I can. Let's keep in touch on mail
ReplyDelete