आतापर्यंत कुत्रे चावल्यावर १४ injections घ्यावी लागतात ह्या मौलिक माहितीपेक्षा कुत्र्याबद्दल काहीही
माहिती नसणारी मी कुत्र्यावर लेख लिहीन असे स्वप्नातही वाटले नव्हते. माझ्या
माहेरच्या व सासरच्या ७ पिढ्यात कुणीही कुत्रे पाळले नव्हते व तसे करायची माझी व
माझा नवरा यांची इच्छाही नव्हती. पण म्हणतात ना कधी / कसे / काय घडेल हे सर्व त्याच्या
हातात असते आणि झालेही तसेच.......
आठवतेय गेल्या चार वर्षांपूर्वी
मी आमच्या लक्कूबद्दल लिहिले होते. आता आम्ही अजून Dog trained झालोय, म्हणून लक्कुच्या अजून गमती-जमती शेअर करायचा विचार केला. जसे
लग्नाळू लोक असतात तसे डॉगाळू जे लोक आहेत त्यांना तेवढीच माहिती.
Practical Experience share करतीय.
लक्कू आमच्या घरी येवून आता आठ
वर्षे झाली. खरतर लक्कुला हल्ली कुत्रा म्हणायला सुद्धा कसेतरी वाटते कारण आता तो
आमच्या घरचा मेंबर झालाय. तो कुत्रा कमी आणि माणसासारखा वागायला लागलाय. हो आश्चर्य
वाटले ना? तो काय काय खातो आणि कसा वागतो हे ऐकल्यावर तुम्हाला नक्की पटेल.
इतक्या वर्षाचे माझे एक निरीक्षण
आहे की जसा डॉग ओनर असतो त्याचे सगळे गुणधर्म डॉगमधेही येतात. अगदी खर... म्हणजे
जश्या ओनर च्या सवयी आणि स्वभाव तसाच त्यांच्या कुत्र्याचा असतो. म्हणजे डॉग ओनर
जर तुसडा असेल तर डॉगही उगीच सगळ्यांवर भुंकत असतो. त्याचे दुसऱ्या डॉग बरोबर पटत
नाही. डॉग ओनर जर गर्विष्ठ असेल तर डॉगही कुणाकडेही ढुंकूनसुद्धा पाहत नाही. डॉग
ओनर जर प्रेमळ आणि जगमित्र असेल तर डॉगही तसाच असतो. जसे माणसांचे विविध प्रकार
असतात अगदी तसेच डॉगचेही असतात. आनंदी, चिडके, भित्रे, रागीट, तुसडे, हसरे, मायाळू
अगदी इमोशनल सुद्धा. लक्कुचे सगळ्यां डॉगशी पटते, त्याला डॉग पेक्षा माणसे भयंकर
आवडतात.
त्याला सगळ्या प्रकारचे खाणे
खायला आवडते. आम्ही वेजीटेरीयन त्यामुळे लक्कुही. मी बऱ्याच डॉगच्या खाण्याच्या
बाबतीतल्या आवडी-नावाडी ऐकल्या आहेत पण आमच्याकडे काही प्रॉब्लेम नाही. खाण्यासाठी
जन्म आपुला ह्या कॅटेगरीमध्ये तो मोडतो. त्याला सगळे बेकरी product भयंकर आवडतात.
त्याला साय भयंकर आवडते, हापूस आंबा, ताक, दही, इडली, डोसे, भात, नूडल्स, थालीपीठ,
लाडू, चकली, फरसाण, ढोकळा, शेंगदाणे, पॉपकोर्न, मोदक, पुरणपोळी हेही भयंकर आवडते.
त्याला बेसिकली सगळेच भयंकर आवडते. तो गाजर, काकडी, कोबी, बटाटा, बिन्स, टोमाटो,
बीट, मुळा, फ्लॉवर इत्यादी भाज्या आणि त्याची सालेही आवडीने खातो. तोही खात
असल्यामुळे आम्ही सगळे देतो. मी किचेन मध्ये गेल्यावर साय खरवडून काढण्याचा किंवा
कापण्याचा किंवा साले काढण्याचा आवाज आला की लक्कू हजर. जर मी कांदा कापत असेन
किंवा भोंगी मिरची, पडवळ, दुधीभोपळा, भेंडी अशा अरसिक भाज्या कापत असेन तर तो एक
सेकंदही थांबत नाही. आपल्या मतलबाचे नसेल तर तिथे थांबायचे नाही अशी बुद्धी त्या
छोट्याश्या मेंदूत आहे हे पाहून थक्क व्हायला होते. पण जर मतलबाचे असेल तर तिथून
हलायचे नाही, सारखे आशाळभूतपणे बघत बसायचे, शेवटी तुम्हालाच गिल्टी वाटले पाहिजे
आपण देत नाही म्हणून. असा काही चेहरा करतात हे डांबिस प्राणी की तुमचीच परीक्षा
असते. ते डोळ्यात भाव आणून पाहणे, ते शेपटी हलवणे, ते लाडात येणे, ते भोवती फिरणे.....Noone can beat dogs……you learn persistence from them.
एकदा डॉक्टर कडे गेलो असता त्याने
सांगितले की लक्कू ओबीज आहे, ( तसा ओबीसीटी आमचा फमिली प्रोब्लेम आहे ) असो. त्याचे
वजन कमी करायला पाहिजे, त्याच्यासाठी डाएटिंग आणि व्यायाम आणि लाईफ स्टाईल चेंजची
आवश्यकता आहे असे त्यांनी सांगितले. झाले आमचे मिशन स्लिम लक्कू चालू झाले. त्याला
पाळायला नेणे, उड्या मारायला लावणे, वायफळ खायला न देणे, फक्त २ वेळेला डॉक्टरनी
सांगितलेले स्पेशल फूड मोजून देणे असे करायचा थोडे दिवस प्रयत्न केला. त्याच्या
डोळ्यांकडे न पाहता कठोर होण्याचा प्रयत्न केला पण नवीन वर्षाचा जसा संकल्प असतो
तसाच आमचा हा प्रयत्न थोडा काळ टिकला. डाएटिंग फूड मुळे त्याची काही भूक भागेना,
आरडओरडा करायचा. शेवटी त्यांनी मोजून खायचे आम्ही मोजून द्यायचे बंद केले.
आमच्याकडे सगळ्यांना इतकी माया येते...खाऊदे ग बिचारा.....कसे डोळे करून पाहतोय
बघ..... किती हा तुझा दुष्टपणा.....त्याला कसले डाएटिंग करायला लावते असे
सगळ्यांनी मलाच इमोशनल blackmail केल्यामुळे नव्याचे नऊ दिवस लगेच संपले. लक्कुच्या
वेटबद्दल आता डिस्कस करायचे नाही असे ठरले. चालतंय की जाड असला तर....काssssही बिघडत
नाही.
बाकीचे पुढच्या भागात JJJ
No comments:
Post a Comment