Monday, 1 December 2014

||विठ्ठल विठ्ठल||

Inspiration: तुकाराम महाराजांचा बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल अभंग

बोलावा विठ्ठल | पहावा विठ्ठल|
वाचावा विठ्ठल| रोजदिशी ||१||
ऐकावा विठ्ठल| करावा विठ्ठल|
स्मरावा विठ्ठल| क्षणोक्षणी ||२||
पहावे नाटक | चालले जगाचे|
धरावे विठ्ठलाचे | बोट घट्ट ||३||
पुसूनिया काजळी | अज्ञानाची काळी|
भरावा विठ्ठल| अंतःकरणात ||४||
टाकुनिया मोह| विषय वासना|
उरावा विठ्ठल| अंतर्बाह्य||५||
साध्य विठ्ठल| साधन विठ्ठल|
साधक विठ्ठल| होऊन जावे||६||

Thursday, 20 November 2014

न-मन

नाम हाच नेम | नाम हेच व्यवधान |
नाम हेच साध्य | नाम हेच साधन||१||

नाम-रूप असे भिन्न | नामातून रूप होतसे उत्पन्न|
रूप असो वा नसो| नाम असे चिरंतन||२||

नाम हीच एक कृती | नाम हीच असे भक्ती|
नामातच सद्संगती | नामानेच शक्य होईल मुक्ती||३||

नाम म्हणजे अखंड अनुसंधान | कर भगवंताच्या स्वाधीन मन |
ऐसे भगवंताचे आश्वासन | मन मग होईल 'न-मन '||४||

अखंड चालो नामघोष| नामाग्नी जाळेल पाप-दोष |
नामानेच मिळेल भगवंत प्रत्यक्ष| मुखी नाम हाती मोक्ष||५||

Monday, 27 October 2014

नादब्रम्ह

सप्तसूर संगीताचे
झंकारले स्वर संवादिनीचे
आरोह- अवरोह अलंकार रागांचे
सुर- लय -ताल बहरती गाण्याचे
साकारले मग गीत मनाचे
हेच असे साध्य साधनेचे
साधनेतून नादब्रह्म साकारायचे
नादब्रह्म हे ओजस्वी ओंकाराचे
ज्योतिर्मय ब्रम्ह  तून गाठायाचे
अन स्वतःच नादब्रम्ह होउन जायचे

Wednesday, 24 September 2014

सृजनाचा आनंद


गेले जवळजवळ दोन महिने मी ब्लोगवर नवीन पोस्ट टाकली नाही त्यामुळे मैत्रिणींची विचारपूस चालू  झाली की काय ग तुझे ब्लोग चे भूत उतरले की काय? काय सध्या कशात एवढी बिझी आहेस? काय मोठे प्रोजेक्ट चालू झालेले दिसतेय? अग आम्ही वाट पाहतोय लिही काहीतरी.......
तुमच्या सगळ्यांचे आभार......I think this is what keep me going :)
तर नमनाला घडाभर तेल झाले......
तर गेले २-३ महिने मी  Zentangle art शिकत होते किंवा करून पहात होते. ( हा माझा सगुण की दुर्गुण माहित नाही पण कशात घुसले की मुळापर्यंत जायचे हा स्वभाव) त्यातून हि ZenT आर्ट जमली व खूप इंटरेस्ट वाढला त्यामुळे आधी 8 cm x 8cm करता करता A3 size पर्यंत बरीच चित्रे काढून झाली. मग विचार आला असे aimlessly  न करता काहीतरी गोल असायला हवा.
So I put goal in front of me - Exhibition Cum Sale
हो मी जरा जास्तच मोठ्ठी उडी घ्यायचे ठरवले. माझ्यासारख्या hardcore Engineer नी जिचा तसा शाळा सोडल्यापासून फार आर्ट शी संबंध आला नाही किंवा जिला उपजत कलाकार म्हणता येणार नाही असे नसताना एकदम Exhibition प्लान करायचे म्हणजे it was really BIIIG challange!!!
मला वाटतेय कुठलेही Exhibition करताना बऱ्याच गोष्टींचा विचार करावा लागतो
१. तुम्हाला काय आवडते ह्यापेक्षा लोकांना काय आवडेल
२. काहीतरी नाविन्य हवे
३. आर्ट appreciate बरेचदा केली जाते ती सेल करण्याच्या दृष्टीने विचार
४. Packing
५. Advertising / Marketing / Displaying/ Venue/ Selling
माझ्या दृष्टीने पाचवा मुद्दा दुय्यम असला तरी त्याचाही विचार करणे गरजेचे होते.
ह्या Art form चा विचार केला तर typical Zentangle piece is black n white, abstract and its on 3x3 inch tile. ह्या गोष्टी विचारात घेता मग मी Zentangle patterns वापरून काय काय करता येईल हा विचार सुरु केला. तेंव्हा वाचताना कळले की हे patterns वापरून तुम्ही जे काही करता त्याला Zia - Zentangle Inspired Art म्हणतात.  मग मीही ह्यावरच लक्ष्य द्यायचे ठरवले. ते ठरल्यावर मग फक्त पेपर वर सीमित न ठेवता बाकी कुठल्या surface वर करता येईल ह्यावर reserch आणी Experiments चालू केले. मग कॅनवास, वूड, सिरामिक, प्लास्टिक, ग्लास, बीड्स, मोती असे वेगवेगळे प्रयोग केले. तेंव्हा लक्षात आले की paper drawing काढून फ्रेम केले की Art piece तयार झाला पण बाकी कुठल्याही surface वर केले असता पुढे बऱ्याच processes चा विचार व अभ्यास करावा लागेल.      
   

हा artform micron टीप pen ने काढायचा असल्यामुळे कॅनवास चा option out झाला. Ceramic was big challenge because of curved surface. pen ला grip यायची नाही, lines बरोबर यायच्या नाहीत त्यामुळे त्यासाठी वेगळी designs choose करावी लागली. सिरामिक वर designs काढल्यानंतर ती waterproof बनवण्यासाठी ती ओवेन बेक करावी लागली. ग्लास चे हि तेच. पण वूड तर कसे बेक करणार म्हणून मग sealent शोधावे लागले. मग transperent, वास न येणारा sealent शोध मोहीम चालू झाली. हा प्रवास जरी एक paragraph मध्ये लिहून झाला असला तरी त्यासाठी बरीच वणवण करावी लागली. वूड च्या बाबतीत ply च्या दुकानात गेल्यावर येवढा छोटा पीस हि बाई मागतेय म्हटल्यावर ती माणसे विचित्र पहायची, त्यात त्यांची भाषा किती mm किती इंच हे मला बापडीला कळायचे नाही. carpenter कडून पाहिजे तसे cut करण्यासाठी त्याला बाबापुता करावा लागला. पण हळूहळू जमले ते.

Earrings- my other passion त्यातही Zia चा वापर व्हावा हि इच्छ्या त्यामुळे मग परत experiments....ह्यासाठी बरेच failed experiments झाले. मग काय काय केले की फेल होते हे कळल्यावर मग काय केले हि बरोबर होईल हे कळले ( माझे trade secret  मी तुम्हाला सांगत नाहीय ते तुमच्या लक्षात येतेय का? ) तर असे करकरता बऱ्याच गोष्टी तयार झाल्या. मग framing, packing चालू झाले. मग point ५ च्या दृष्टीने विचार चालू झाला.
  

माझी मैत्रीण मंजुषा हिच्या पुढाकाराने मी राहते त्याच complex मध्ये माझे पहिले वाहिले (maiden) exhibition करायचे ठरले.

Exhibition छानच पार पडले. १-२ लोक वगळता सर्वांसाठी हा प्रकार नवा होता. त्यामुळे त्यांना सांगताना मजा आली. बरेच जणांना वाटले मी कुणाची चित्रे विकायला आणलीत. कुणाला हि pen नी काढली आहेत ह्यावर विश्वास बसेना. अगदी अनोळखी माणसांकडून " wow", "Intricate", "awesome"," amazing", "different", "surprise" अशी विशेषणे ऐकताना २-३ महिन्याच्या मेहनतीचे चीज झाल्यासारखे वाटले.
 


 








Getting very good response and making good sale was cherry on the cake.
ह्यातील प्रत्येल गोष्ट करतानाचा आनंद दरवेळी वेगळा होता. मी प्रत्येकवेळी निर्मितीचा (creation) आनंद अनुभवला. आणी येवढेच सांगू शकेन की तो काही औरच होता.

Friday, 18 July 2014

Brain Yoga: Some more Zentangle drawings


Free Birds
Couple dance


Zentangle jewellery
Freehand


Ladies gang

Flower

Necklace design


3D tangling














Sunday, 29 June 2014

Zentangle: Hottest trend of meditation

"Zentangle is a creative and newest way to meditate" , this is how I was introduced to this new form of art. For few months I used to just register it in my head by observing the drawing done by my friends. One day I really felt I should try it on my own and there started this Zentangle journey of mine.


 

This was my first drawing, It was mostly looking like mehandi design...very basic and easy. This also made me understand more about it. So I started reading more and trying to understand more of these patterns and how to do it. Personally I am very much enthusiastic and passionate about whatever I do. So instead of wasting(spending) time on reading and learning I thought of learn it by myself and make mistakes and learn more.So there is NO professional training for my drawings. But there are so many sites which offers step by step guide.

 

This is what I read about this art and liked it very much hence giving that information as it is:
Zentangle, derived from the Japanese word ‘Zen’ for meditation and English word ‘Tangle’, has a philosophical base. It has been known to improve self-esteem, creativity and to keep you calm and focused. This is because Zentangle "helps you to stay in the present." And this technique, akin to meditation, offers benefits proven by scientific research as well. When you meditate, your mind goes into an ‘alpha state’ and your brain is idle and calm. Zentangle has a very similar effect on the mind.



For Zentangling you need only pen and paper and basic knowledge of geometry. With this you can start straightaway. Tangling is nothing but drawing geometric shapes repetitively in fixed manner. This repetition add beauty to drawing. Once you are through with basics you can draw some meaningful pictures. 


 

After I started doing this I thought let me implement my knowledge on something than just drawing on paper. During same time I was also trying to reuse my old car tyres somewhere in house. This is what I came up with. I just spray painted tyres and cut the plywood into circles to fit in and some zentangling on top with permanent marker and my garden set was ready.


 

 

 

Even I am newcomer and amateur in this art form and trying and learning new things every day. I will keep updating my drawings here. I recommend it to everyone who wants to learn about concentration or mediation. Off course this is first baby step towards it, but everyone has to start it somewhere and sometime right ???

There are lot of sites on internet but few I am giving here
1. http://zentangle.blogspot.in/ ( this one all types of tangling techniques used)
2. http://www.zentangle.com/index.php?option=com_content&view=article&id=24&Itemid=113
3. http://www.pinterest.com/karencoombs/zentangle-art/

Monday, 23 June 2014

रथयात्रा

चला जावू रथयात्रेला
जीव शिवाला भेटवायला

यात्रा असे हि प्रत्येकाची
प्रत्येक शरीररूपी रथाची

चौखूर उधळती इंद्रियरुपी घोडे
लावी मन मग लगाम कोरडे

असेल जरी विषयरूपी पथ दुर्गम
परंतु जिवात्मा रथस्वामी आगम

सारथ्य करेल जर विवेकबुद्धी
होईल मग यात्रेची सिद्धी

कर मन स्थिर आणी बुद्धी कुशल
यात्रा होईल मग नक्की सफल


Friday, 13 June 2014

भक्ती

भक्ती म्हणजे सहज स्थिती
भक्ती म्हणजे चित्तातील भगवंत नावाची वृत्ती

भक्ती म्हणजे अनासक्ती
भक्ती म्हणजे बाहेरून प्रवृत्ती व आतून निवृत्ती

भक्ती म्हणजे अढळ श्रद्धेची शक्ती
भक्ती म्हणजे निर्मळ आनंदाची प्राप्ती

भक्ती म्हणजे अहंकार मुक्ती
भक्ती म्हणजे मायानदी पार करवणारी युक्ती

भक्ती म्हणजे आत्मस्वरुपाची  प्राप्ती
भक्ती म्हणजे सहज सुलभ सायुज्यमुक्ती

श्रीमद् भगवद् गीता का वाचावी?

श्रीमद् भगवद् गीता - Divine Song of God


आपल्या सगळ्यांना पांडव व कौरवांची गोष्ट माहीतच आहे. धृतराष्ट्राच्या अतिमहत्वकांक्षेमुळे व आंधळ्या प्रेमामुळे उन्मत्त झालेले दुर्योधन / दुःशासन व इतर कौरव आणी लहानपणीच वडीलांचे छत्र हरवल्यामुळे पण महत्वकांक्षी कुंतीने प्रेमाने, सहृदयतेने  वाढवलेले धर्म, अर्जुन, भीम,नकुल व सहदेव यांच्यात झालेले युध्द म्हणजे महाभारत.
अनेक नामुष्कीचे प्रसंग येवूनसुद्धा, युध्द थांबवण्याचे सगळे प्रयत्न फोल ठरल्यानंतर पांडवांनी कौरवांबरोबर युध्द पुकारले.युद्धाची तयारी दोन्ही बाजूनी बरेच वर्ष चालू होती  कारण हे साऱ्या भारतवर्षाचे युद्ध होते. भगवान श्रीकृष्णानी  अर्जुनाचे सारथ्य करायचे ठरवले. 
जेंव्हा युध्द चालू झाले तेंव्हा अर्जुनाच्या मनात अनेक भावना उचंबळून आल्या व तो शस्त्र उचलावयास तयार होईना. आपले गुरुवर्य, सगेसोयरे यांच्याविरुध्द युध्द करण्यापेक्षा संन्यास घ्यावा अश्या भावना त्याच्या मनात येवू लागल्या. तेंव्हा भगवानांच्या लक्षात आले की हा प्रश्न दिसतो तितका लहान/सोपा  नाही. त्यांना अर्जुनाच्या प्रश्नांचे ( problems ) चे कारण ( root cause ) कळले व त्यांनी वरवर प्रश्न सोडवण्याऐवजी root cause नष्ट करण्याचे  ठरवले व गीतेला प्रारंभ झाला.
५ ० ० ० वर्षापूर्वी लिहिलेला परंतु outdated न झालेला हा ग्रंथ आहे कारण हा कुठलाही जाती,धर्म,वर्ण, लिंग ह्याकरता नाही. ज्यांना कुणाला ज्ञान मिळवण्याची इच्छा आहे त्यांच्याकरता आहे. ५ ० ० ० वर्षापूर्वी मानवाचे प्रश्न तेच होते व आताही आहेत त्यामुळे गीता आज जशीच्या तशी अर्जुनाप्रमाणे प्रत्येक माणसाला लागू आहे.

गीता तरुणांना कसे जगायचे तर वृद्धांना मरणाला सामोरे कसे जायचे ते शिकवते. मरण म्हणजे अंत नाही तर अजून एका आयुष्याची सुरुवात हे शिकवते.गीता जे अज्ञानी आहेत त्यांना ज्ञान तर जे ज्ञानी आहेत त्यांना माणुसकी शिकवते. जे निर्बल आहेत त्यांना शक्ती/ दिलासा देते तर जे सबल आहेत त्यांना जगण्याची दिशा देते. गीता मनावर नियंत्रण व मनाचे training शिकवते. तणावमुक्त जीवन कसे जगायचे ते शिकवते. थोडक्यात प्रत्येक मनुष्याला त्याला उपयोगी पडेल असे  मार्गदर्शन करते. ज्यांना हे जीवन ज्ञान मिळवायचे आहे त्यांनी गीता एकदातरी जरूर वाचावी - कळवून घ्यावी व आत्मसात करण्याचा प्रयत्न करावा.

Tuesday, 13 May 2014

चांदोबाचा झबला

ह्या ओळी माझ्या सगळ्या भाचरांसाठी......
(बालकविता लिहायचा हा माझा पहिलाच प्रयत्न - चूकभूल माफ करा :))


एके दिवशी म्हणाला चांदोबा आपल्या आईला
शिवून देग मला माझा लोकरीचा झबला ||

रात्रभर सतावतो वारा अन वाजते मला थंडी
आकाशाची सफर करायची पण भरते मला हुडहुडी
आजारी पडतो मी सारखा, हवा न मानवे मला
शिवून देग मला माझा लोकरीचा झबला ||१||

चांदोबाची व्यथा ऐकून आईस वाईट वाटले
काय करावे, कसे करावे हे तिस नाही कळले
एके दिवशी होसी छोटा अन एके दिवशी मोठा
सांग कसा शिवू मी तुला लोकरीचा झबला ||२||

सांग घेऊ माप मी छोटे-मोठे कुठले
की शिऊ मी तुला पंधरा लोकरीचे झबले?
ऐकून चांदोबा झाला खुश, म्हणे चालेल आई मला
शिवून देग मला माझा लोकरीचा झबला ||३||

Wednesday, 7 May 2014

Diet

आजकाल कुठेही जावा, गप्पांमध्ये खाणे हा सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय असतोच. आणी पूर्वी आपण किती व कसे खायचो आणी आता काय आणी किती खातो ह्याही गप्पा चवीने मारल्या जातात. कमी खाणे हे हल्ली काही घरात ठरवून तर काही घरात इलाज नाही म्हणून केले जातेय,  ह्याच संदर्भातून सुचलेले हे विडंबन ..........
( खालील ओळी दिवस तुझे हे फुलायचे ह्याच्या चालीत म्हणाव्यात)
दिवस तुझे हे वाळायचे,
मोजून मापून जेवायचे ||

वजन वाढते फार
सोसेना पायाला भार
कळेना काय ते करायचे ||१||

रोज सकाळी सकाळी
चहाची हुक्कीही भारी
पाण्यात मध-लिंबू पिळायचे ||२||

ब्रेड-बटर, अंडी चार
पण cholesterol वाढवी फार
दुधात मध-ओट ओतायचे ||३||

पराठे अन तुपाची धार
पण कॅलरीज वाढवी फार
पोटात काकडी-tomato भरायचे ||४||

४ ची वेळ वडापाव-चहाची
पण  dietician चे ऐकायची
पाण्याबरोबर मारी बिस्कीट ढकलायचे ||५||

रात्रीची वेळ निवांत चोपायची
पण हल्ली नाही परवडायची
वाळक्या फुलक्यावर भागवायचे ||६||

Monday, 28 April 2014

झालासी भक्ताचा देव तू

बरेच महिन्यापूर्वी माझ्या वाचण्यात एक लेख आला. त्यात हे लिहिले होते

" Each one of us is potential Hanuman and can find ways of changing destiny with our mind-actions-words. We can face challenges with ease. When Hanuman is awakened within life is experianced as one illuminated stretch of being where there is unlimited strength, power and purpose."

मी हे जेंव्हापासून वाचले तेव्हापासून माझ्या मनात "हनुमान" हा विषय घोळत होता. मला हि कल्पना फार आवडली. आपण जेव्हा हनुमानाची प्रार्थना करतो तेव्हा आपणही आपल्या आतील उर्जा-शक्ती (हनुमान) जागे किंवा उद्दीपित करत असतो. खरतर हनुमान वानर कुळातजन्मला असल्यामुळे स्वतःला सामान्य समजत होता. त्याला त्याच्या सामर्थ्याची कल्पना नव्हती. पण जेव्हा त्याची श्रीरामाची भेट झाली तेंव्हा त्याला त्याच्या जीवनाचे उद्दिष्ट समजले. आपले मनही वानरासारखे निरर्थक उड्या मारीत असते. जेव्हा गुरूची भेट होते तेंव्हा आपल्याला आपल्या मनाच्या सामर्थ्याची जाणीव होते. रामाची भक्ती करता करता हनुमान इतका मोठा झाला की लोक त्याला देव म्हणून पूजू लागले.ह्याच संदर्भात मला सुचलेल्या काही ओळी..........

हे भगवंता हे हनुमंता
झालासी भक्ताचा देव तू ||

बुद्धिमत्तेचा सागर तू
चौदा कलांचा स्वामी तू
अष्टसिद्धी योगी तू ||१||

सामर्थ्याचा अविष्कार तू
महातपस्वी योद्धा तू
पराक्रमाची परिसीमा तू ||२||

रुद्रांचाही रुद्र तू
बलवंत असा योगी तू
असीम श्रद्धेचे भांडार तू ||३||

सूक्ष्माहुनी सूक्ष्म तू
ब्रम्हांडहूनी मोठा तू
मनापेक्षाही चपळ तू ||४||

आदर्श असा साधक तू
सेवा व शक्तीचे प्रतिक तू
रामभक्तीचा उच्चांक तू ||५||

हे भगवंता हे हनुमंता
झालासी भक्ताचा देव तू
एकच मागणे असे तुजपाशी
कर जागृत माझ्यातील हनुमंत तू
कर जागृत माझ्यातील हनुमंत तू||

Wednesday, 26 February 2014

अध्यात्माची सप्तपदी

चला जाऊ अध्यात्माच्या प्रवासाला
स्वतःच स्वतःच्या  संगतीला ||

पहिले पाऊल जिज्ञासेचे
स्वतःच स्वतःला शोधण्याचे
मुमुक्षु असे नाव त्याचे ||१||

दुसरे पाऊल ईच्छ्येचे
स्व-उन्नतीकरता कर्म करण्याचे
ज्ञान संपादन करण्याचे ||२||

तिसरे पाऊल श्रद्धेचे
हे असे अति महत्वाचे
जे घडते ते चांगले ह्या विश्वासाचे||३||

चौथे पाऊल शिस्तीचे
यम-नियम नित्य पाळण्याचे
साधना असे नाव त्याचे||४||

पाचवे पाऊल शरणागतीचे
अहंकार/अविनय गळून पडण्याचे
सर्वस्व भगवंताच्या पायी वाहण्याचे||५||

सहावे पाऊल अनुसंधानाचे
मन भगवंताच्या स्वाधीन करण्याचे
नित्यनियमाने साधण्याचे ||६||

सातवे पाऊल ध्यानाचे
आपोआप त्रिपुटी गळून पडण्याचे
सत-चित-आनंद होण्याचे ||७||

Monday, 24 February 2014

आई

फडक्यांच्या घरी सातवे कन्यारत्न जन्मले
लाडाचे शेंडेफळ माझी माय ती ||
भावासी माया लावी बहिणींनाही वात्सल्य देई
भाचारांची लाडकी मावशी माझी माय ती ||
आदर्श असे सून ती, आदर्श असे वहिनी
आदर्श अर्धांगिनी माझी माय ती ||
कुमारांची आशा ती, कुमारांची मनीषा ती
मंजिरी-स्वप्ना-धनश्री ची आदर्श माय ती ||

माय माझी सखी, माय माझी गुरू
माय माझी दैवत, मी तिचे पाखरू ||
तिच्या वेलीवरची कळी मी
तिच्या छ्बीची सावली मी
तिच्या गुणांचे प्रतिक मी
तिच्या संस्काराचे प्रतिबिंब मी
तिच्या शिस्तीचा परिपाक मी
तिच्या अस्मितेचा ताठ कणा मी
इतकी वर्षे असे ती वेगळी अन वेगळी मी
परंतु आता झालो आहे मीच ती अन तीच मी ||
असेल जर पुनर्जन्म कधी, आई तुझ्याच पोटी जन्मेन मी
आई तुझ्याच पोटी जन्मेन मी ||