Sunday, 15 December 2013

प्रवास मुक्तीचा

प्रवास जन्मोजन्मीचा,  असे जरी हर व्यक्तीचा |
तरीही असेल वेगवेगळा,  प्रवास मुक्तीचा ||

नरदेह असे अति दुर्मिळ, पुरुषार्थ साधावा बुद्धीचा |
स्वतःच कर तू उद्धार स्वतःचा, सुरु कर प्रवास मुक्तीचा ||

चंचल जरी मन तरी, कर अभ्यास योगाचा |
सोहं साधना करेल सोपी, प्रवास मुक्तीचा ||

भगवंतानी दिले आश्वासन, व्यर्थ न जाई अभ्यास विवेक वैराग्याचा |
ठेऊनी विश्वास त्यावर, चालू ठेव प्रवास मुक्तीचा ||

संतानी सांगितलेला मार्ग अवलंब, ज्ञान-कर्म-भक्तीचा |
सुखकारक होईल मग प्रवास मुक्तीचा ||

संचिताचे होईल ज्ञान, प्रारब्धासाठी भाव भक्तीचा |
क्रियमाणाचे निष्काम कर्म संपवेल मग प्रवास मुक्तीचा ||

कोऽहम्

बाळ गोडूले, बाळ सोनुले
बाळ छकुले, बाळ तान्हुले                       ( कोऽहम् )

मुलगी झाली झाली मुलगी, पहिली बेटी, पेटी धनाची
नात आमची लाडाची, नात मालतीगोविंदांची         ( कोऽहम् )

कन्या जरी परधन, लाडाकोडानी वाढवायची
काळजाचा तुकडा , कन्या मनीषाकुमारांची          ( कोऽहम् )

 स्नुषा म्हणजे दुसरी मुलगी, प्रेमाने-हौसेने स्वीकारायची
आमची मंजिरी, स्नुषा विजयाश्रीकांताची             ( कोऽहम् )

भार्या म्हणजे सहधर्मचारिणी, सखीसोबती आनंद-दुःखाची
वेडुली मैत्रीण, भार्या विवेकाची                    ( कोऽहम् )

माता तरी  Friend, philosopher - guide वाटायची
आई माझी सबकुछ,  माता ओमकाराची            ( कोऽहम् )

कन्या-स्नुषा-भार्या-माता तरी, मी नाही कोणाची
सगळे जरी माझे तरी, मी नाही कोणाची
एकटी मी तरी, प्रवास जन्मोजन्माचा
प्रवास मला उन्नत करण्याचा, प्रवास माझ्या मुक्तीचा ( सोऽहम् )


Monday, 9 December 2013

Passion Jewellery: Earrings

Hi all,
Earrings catalog is moved to following address:
Please click on this link to see all images.


Monday, 18 November 2013

ब्रेक के बाद.....

हल्ली मी स्वतःपुरती चित्रपट theater ला जाऊन पाहायचा नाही अशी प्रतिज्ञा केलीय. माझे म्हणणे असे की (बाकीच्यांनी काहीही करावे माझा आक्षेप नाही) हल्ली असे(लायक) चित्रपट लागत नाहीत व दुसरे म्हणजे २-३ आठवड्यात चित्रपट कितीही करोडचा असला तरी टीव्हीवर येतो. त्यामुळे बघायचा, बघायचा नाही, फ्री आहे म्हणून बघायचा, फ्री आहे म्हणून बघायचा नाही, थोडा पहायचा, इंटर्वल पर्यंत पहायचा, जेवता जेवता पहायचा अश्या असंख्य शक्यता असतात व स्वातंत्र्य असते. बर Zee TV वरचा ह्या Sunday चा नाही जमला तरी लगेच Sony वर असतोच. दोन्ही जरी हुकले तरी नो tension, परत Zee TV वर दाखवतात. कितीही ठरवले नाही पाहायचा तरी ते दाखवत राहतात.
असो नमनाला घडाभर तेल झाले......आता point च्या  मुद्यावर येते.
जवळजवळ गेले वर्षभर SRK, DP आणि RS यांचा चित्रपट येणार अशी धूम होती. SRK व RS हे पहिल्यांदाच एकत्र येणार त्यामुळे उत्सुकता अगदी शिगेला पोचली होती. गाणी बघून-बघून जवळजवळ चित्रपट कसा काय असणार हे कळले होते तरीही सर्वजण FRIDAY ची वाट पाहत होते आणि एकदाचा तो आला. माझ्या असंख्य प्रतिज्ञांमुळे कावलेल्या माझ्या घरच्या लोकांनी प्रतिज्ञा केली की आता TV वर येणारा 'चेन्नई एक्सप्रेस' सोडायचा नाही व तो मलाही पहायला लावायचा. त्यामुळे आम्ही सर्वजण जय्यत तयारी करून बसलो. स्वयंपाक / जेवण सगळे उरकून बसलो (उगीच disturb नको) लकीचे सगळे कार्यक्रम आटोपले(उगीच disturb नको) सगळे फोन switch off (उगीच disturb नको) असो. आपापल्या जागा पकडल्या- उजवीकडे coke, डावीकडे popcorn अशी सगळी जय्यत तयारी झाली. (उगीच disturb नको)
आणी तोच तो क्षण, तीच ती वेळ आली ..........
पहिली १० मिनिटे झाली, आपण नक्की काय पाहत आहोत असे वाटत असतानाच Advertisement break ची वेळ झाली...आणि कधी नव्हे ते मला आनंद झाला. मी हल्लीच्या adv. च्या creativity ची दाद दिली. १-२ मिनिटे करता करता १० मिनिटे झाली. परत चित्रपट सुरु झाला. हा चित्रपट ना शाहरुख चा वाटत होता ना रोहित चा ...असे काही वाटे तोपर्यंत परत Advertisement break आणि परत........ आनंद .........परत creativity ची दाद .....१० मिनिटे झाली........ परत चित्रपट सुरु झाला. असा पुढचा जवळजवळ एक- दिड तास आम्ही जाहिराती पहिल्या व मधे मधे सहन होईल तेवढा चित्रपट पहिला. शेवटी कंटाळून दुसरा channel लावला तिकडेही तेच. असे बरेच channels बदलून शेवटी बातम्या लावल्या तर तिकडे
" तुम्ही कुठेही जाऊ नका.....आम्ही अजून ब्रेंकिंग न्यूज घेऊन परत येतोय थोड्याश्या विश्रांतीनंतर"
बातम्या मध्ये सुद्धा ब्रेक?????
हल्ली serials/ movies / न्यूज च्या मध्ये ब्रेक न होता ब्रेक च्या मधून मधून कार्यक्रम होऊ लागलेत. प्रत्येक कार्यक्रमाचे १०-१२ जाहिरातदार असतात त्यामुळे प्रत्येकाची एकदा जाहिरात दाखवली तरी १०-१५ मिनिटाचा ब्रेक ठरलेला असतो. हल्ली मी त्याचा त्रास करून न घेता व त्यावर चर्चा- चर्वण न करता त्याचा आनंद घ्यायचा ठरवलंय. आणी खर सांगू मजा येतेय.
हल्ली जाहिराती कशाकशाच्या असतात. प्रचंड variety असते. प्रत्येक वर्गासाठी खास जाहिराती असतात. छोटा व तरुण वर्गासाठी जास्त. ह्या वर्गाना खेचून आणण्यासाठी प्रचंड डोके वापरलेले असते. काही जाहिराती सामाजिक भान जाणून केलेल्या असतात की ज्याची आपण वाट पाहतो. जसे Amul / Idea / Vodafone/ Tata Tea . तर काही तासभर विचार करून करून सुद्धा कळत नाही की नक्की ही कशाची जाहिरात होती. काहीही विषय नसलेल्या सेरीअल्स पाहण्यापेक्षा मला हल्ली जाहिराती पाहायला आवडायला लागलेय. काही सेकंदामध्ये एखादा विषय किती छान मांडता येतो व किती चांगल्या प्रकारे लोकांपर्यंत पोहोचवता येतो याचे उदाहरण म्हणजे जाहिराती. मनोरंजनाबरोबर माहितीही....हल्ली ज्याला infotainment म्हणतात ते. कुठलीही खरेदी करायच्या आधी mindset तयार करायचे काम जाहिराती करतात. किंवा काही अगदी instant connect होतात जसे Airtel - जो तेरा है मेरा / Cadbury - कूछ मिठा हो जाये / Surf - डाग अच्छे है / Fevistick - चुटकी मे चीपकाये / ५ स्टार - रमेश-सुरेश / Havells / Flipkart इत्यादी. कित्येक प्रोडक्ट्स लोक(मुले) जाहिराती चागल्या किंवा effective असतात म्हणून खरेदी करून पाहतात. सगळ्यात जास्त परिणाम बच्चे कंपनीवर होतो.....बरेचदा त्यांची डिमांड आईकडे अशीच असते जसे Adv. मध्ये आहे तसे आणून दे. Maggi noodles / Ice creams  / Kurkure / Chips ह्यांचा तरी adv. मुळे प्रचंड सेल होतोय. मात्र Deodorant आणी पान मसाला च्या जाहिराती मात्र मूर्खपणाचे कळस वाटतात. मुलीना मुलांच्या मागे लागण्याचे एकच काम येत असल्यासारखे प्रत्येक जाहिराती मध्ये तेच. Irritating.
हल्ली मलाही advertisement best आहेत किंवा bokvas आहेत असे analyse करायला मजा येते. I am enjoying it....Don't underestimate power of Advertising....mind U!!!

(मला adv. बद्दल technically फार माहिती नाही माझे विचार हे फक्त viewer म्हणून मर्यादित आहेत)


भ्रमणध्वनी पुराण

||मोबाईल मंत्र बोला वाचे||
सध्या फोन (नुसता फोन नाही म्हणायचे - स्मार्ट फोन) हा सगळ्यांच्या आयुष्याचा अविभाज्य घटक बनला आहे. त्याचे गुण पाहता ते बरोबरही आहे पण फोन चा उपयोग हा फक्त convenience म्हणून न राहता आपण त्याच्या आहारी गेलोय. आजकाल प्रत्येकाच्या हातात फोन असतात व सारखे त्याबरोबर चाळे चाललेले असतात. कित्येकांना तर दर २ मिनिटांनी फोन पहायची सवय असते. समोर कितीही महत्वाचे बोलणे चाललेले असले तरी घडीघडी फोन तपासणे त्यांचे चालू असते. पूर्वी कधीकाळी सगळ्यांचे नंबर पाठ असायचे......पण हल्ली डोकेच चालत नाही......नशीब नावे तरी लक्षात राहतात अजून. कॅमेरा, फोनमध्ये असल्यामुळे हल्ली लोक कशाचाही फोटो काढत सुटतात....नुसत्या २ डोळ्यांनी कशाचाही आस्वाद घेतला तर शिक्षा होईल कदाचित. आजकालची तरुण पिढी बद्दल तर काही बोलूच नये. ४ सख्खे मित्र भेटले तरीही चौघे/चौघी फोन वर काहीतरी करत असतात, यदा कदाचित बोलत असतील तर फोन ( हे app/game download केले का वगैरे) बद्दलच बोलत असतात. ह्याच साधारण विषयावर काहीतरी सुचले म्हणून share करतेय.........

जिकडे पहावे तिकडे मोबाईल सर्वांच्या हाती |
त्याच्याविना अगदी चैन पडेना ||१||

मोबाईल फोन हल्लीसर्वांचा लाडका|
गळ्यातला ताईतझाला आहे||२||

नसेल जेवण चालेल तरीही| नसेल झोप हरकत नाही|
नसतील कपडे चालेल तरीही| पण मोबाईल हवा||३||

जितका मोठा फोन |तितका तुमचा रुबाब|
Apple आणी Samsung| असता बोलूच नये||४||

मोबाईल करतो आकडेमोडमोबाईल सांगतो वेळ|
मोबाईल सांगतो अलार्म मोबाईल खेळवतो खेळ (games) ||५||

माझे  तो घड्याळमाझी ती  डायरी|
माझा तो कॅमेरागुणी बाळ||६||

माझा तो आरसामाझा तो GPS|
माझा तो dictionary| पत्रकार माझा||७||

मला संदेश पोचवीमाझा संदेश पोचवी|
मला गाणी ऐकवीमित्र माझा||८||

आजकाल मजसीकाळ/वेळ/तारीख/दिवस|
मोबाईल सांगेआठवणीने||९||

माझा तो डोळामाझा तो कान|
माझे तो डोकेसर्वही असे||१०||

मोबाईल येवढा हुशारस्मार्ट म्हणती त्यासी|
त्याच्यावाचून हल्लीमाझे सगळेच अडे||११||

फोन स्मार्ट आहेत्यामुळे डोके माझे बंद|
सगळे काही तोचठरवतो हल्ली||१२||

फोन शिवाय चालेनाफोन शिवाय करमेना|
एक मिनिटहीउसंत मिळेना||१३||

५ मिनिटे जरी न वाजता फोनघालमेल जीवाची मन हैराण|
सखा तो २४ तासाचा | Sms, Application and Ringtone  ||१४||

मोबाईल खरे तर आपला सेवक| पण आपणच झालो दास त्याचे|
किमया ही मोठी असे विज्ञानाची| पण आपणच झालो आहे बाहुले त्याचे||१५||

Tuesday, 12 November 2013

कुंदनची फुले

मला नेहमीच कुंदन च्या रंगांचे आकर्षण वाटत आलेय. गेल्या काही वर्षापूर्वी पहिल्यांदा कुंदन दागिन्यांच्या रूपाने घरी आले. हल्ली कुंदन ची रांगोळी घराघरात पोचली. दागिने / रांगोळी / सजावट ह्या करता कुंदन वापरले जाऊ लागले. ह्या टिकल्या वेगवेगळ्या रंगात व आकारात मिळत असल्यामुळे खूपच गोष्टी करता येतात. रांगोळी चे बरेच प्रकार केल्यानंतर त्याची फुले कशी दिसतील ह्याबद्दल मला नेहमी उत्सुकता होती. नुकती मी ती करून ही पाहिली, खूप सुंदर दिसतात. पण ही फुले कशी वापरायची हा मोठा प्रश्न होता. ही फुले एकत्र बांधण्यासाठी वायर वापरली जाते त्यामुळे ती चिकटवायला खूप अवघड होते. मी कुन्दांचे काही प्रकार करून पहिले त्याचे काही फोटो......








Tuesday, 29 October 2013

धन्यवाद.!! असाच स्नेह ठेवा.........


गेल्या एक महिन्यापूर्वी मी blogging चालू केले ते माझ्या मनातले पोहोचवण्यासाठी, माझे मन मोकळे करण्यासाठी आणी माझ्या सगळ्या जवळच्याच्याबरोबर share करण्यासाठी. पण हे लक्षात आले की ह्या प्रवासात मी एकटी नाही.......My near and dear ones are reading, enjoying and looking forward for posts.......आणी तोंडभरून कौतुकही करत आहेत, माझा उत्साह वाढवत आहेत मला sms आणी mail करून ........आणी मन सुखावलं!!!!
त्यामुळे आपल्या सगळ्यांचे धन्यवाद कसे द्यावेत हे समजत नव्हते......म्हणून त्यासाठी ही खास पोस्ट. माझे लेख वाचून आपण सर्वांनी त्यावर आवर्जून अभिप्राय दिल्याबद्दल अनेक अनेक धन्यवाद!!!! असाच स्नेह ठेवा.............................................





Monday, 28 October 2013

Unlimited buffet

माझ्या मुलाच्या वाढदिवसाकरता planning चालले होते. त्यांनी ठरवले की अगदी जवळच्या ७-८ जणांना तो बोलावणार आहे.त्यांना चित्रपट पाहायचा असल्यामुळे घरीच लंच करायचे ठरले. मला ऐवढे सांगून तो आपल्या कामाला गेला की, everyone including himself will prefer  Chinese food. माझ्या डोक्यात काय करायचे त्याचे चक्र चालू झाले. व्हेज चायनीज लंच म्हणून मग मी Fried rice / Hakka noodles/Gobi Manchurian / Soup असे main course ठरवले आणी starters म्हणून Popcorn/ Cake and Chilli potatoes. वाढत्या वयाची मुले व जेवायची वेळ असल्यामुळे हा मेनू perfect आहे असे माझे मत होते. मेनू ऐकून तोही खुश होईल म्हणून मी लगेच सांगायला गेले, तर त्याचा response
" येवढेच"
मी म्हणाले अरे व्हेज चायनीज लंचमध्ये अजून काय करणार? हे हेल्दी आणी पोटभर दोन्ही आहे, माझ्यातील आई जागी झाली.त्याच्यातील हि teenage मुलगा जागा झाला,म्हणाला, Unlimited buffet मध्ये किती पदार्थ असतात. मग मीही अरे हे घर आहे, हॉटेल नाही असे सुनावले. आणी मग जशी teenager मुलांची आणी आयांची जुंपते तशी आमचीही जुंपली. पण दिवसभर Unlimited buffet  हा शब्द डोक्यात घुमत होता.
अमर्याद स्वेच्छ्या भोजन म्हणजे आपण मराठीत ज्याला Unlimited buffet म्हणतो तो सध्या बोकाळलाय. कुठल्याही restaurant मध्ये जावा South / North / Italian / Mexican / Lebanese / Gujarati/ Rajasthani / Kerala सगळीकडे बुफे जास्त करून पाहायला मिळतो. लोकही हल्ली हेच prefer करतात मग restaurant वाल्यांचे काय जातेय?
Unlimited buffet  म्हणजे ७-८ प्रकारची starters/ soups/ 10 course main course/ दहा प्रकारची deserts असा प्रचंड spread असतो. एक-दोन महिन्यापूर्वी आम्ही डिनर ला गेलो होतो, तो spread येवढा spread करून ठेवला होता की डिशेस भरून आणेपर्यंत दमछाक व्हावी व परत भूक लागावी. मी नवऱ्याला म्हणाले आपल्याला गायीसारखी ४ पोटे नाहीत, एकच पोट किती खाणार?
तो नॉर्थ इंडिअन बुफे होता, ७-८ प्रकारची लोणची, असंख्य प्रकारचे पापड, चटण्या, सलाड चे बरेच प्रकार, ७-८ प्रकारची starters, २-३ प्रकारची  soups, ५-६ प्रकारच्या भाज्या, ४ प्रकारचा भात, नूडल्स, थाई करी, तुम्हाला कुठल्या प्रकारची रोटी पाहिजे तसे ते आणून देणार, सगळ्याची taste हवी असेल तर तसे आणी  दहा- बारा प्रकारची deserts
हा---------------------------------- अक्षरशः लिहितानाही दम लागला. बर हे फक्त व्हेज वाल्यांसाठी.
प्रत्येक पदार्थाचा एक घास खायचा म्हणाले तरी ४ पोटे लागतील.  बर प्रत्येकवेळी डिश बदलायची, हि गोष्ट माझ्या जीवावर येते, किती काम वाढवतो आपण सगळ्यांचे. आणी येवढा स्प्रेड म्हणून पैसेही भरपूर. तुम्ही खावा न खावा त्यांनी मेहनत तर घेतलीय. पण म्हणतात ना ही किंमत आपण मोजतो ते काही क्षण तुम्हाला राजासारखे वागवले जाते. You spent some time like King. काय पाहिजे ते मिळेल मागून तर बघा. एवढे सगळे असूनसुद्धा काहीतरी विचित्र मागणारे लोकही मी पाहिलेत. १०० पदार्थ समोर असताना पण मला तेच पाहिजे किंवा हे का नाही अशी हुज्जत घालणारे लोक पाहिलेत.
 Buffet ची प्रथा चालू झाली  Switzerland मध्ये आणी हळूहळू मग France , America मध्ये. हे चालू व्हायचे कारण जेणेकरून पदार्थाकडे पाहून लोक आपापले वाढून घेतील. आपल्याला हवे तेवढे घेतील , जेणेकरून घेणारा खुश होईल व अन्न वाया जाणार नाही. पण हा buffet तरीही limited होता. पण हल्लीच्या Unlimited buffet  मुळे अन्नाची प्रचंड नासाडी होताना दिसतेय.
अगदी भारतीय - महाराष्ट्रीयन सर्व सामन्याच्या घराचा विचार केला तरी उजवीकडचे / डावीकडचे असे ७-८ पदार्थ असायचेच. चटणी / कोशिंबीर / उसळ /भाजी / आमटी / पोळी / भात /ताक असा रोजचा मेनू असायचा सणाच्या दिवशी कडी-वडा / तळण / मसालेभात / गोड पदार्थ असा भरगच्च मेनू असायचा. पूर्वी सगळ्या बायका व पुरुष यांना शारीरिक कष्ट इतके असायचे की येवढ्या अन्नाची गरज होती. खायची व पचवायची ताकद होती. पण हळूहळू Automation / lifestyle मधल्या बदलामुळे शारीरिक कष्ट कमी झाले आणी खाणेही.
आजकाल तर एकीकडे लोक diet करताना दिसतात म्हणजे ऐक पेढा खायचा असेल तर २ फेऱ्या जास्त किंवा १० मिनिटे व्यायाम जास्त करायचे असे चालू असते तर दुसरीकडे हे Unlimited buffet  प्रकरण. हल्ली सगळ्या ऑफिस मधल्या पार्ट्या अशाच असतात. आजकालच्या मुलानाही त्यामुळे घरीही आईने एवढे पदार्थ करावेत अशी अपेक्षा असते.
पूर्वी कुतूहल म्हणून, नाविन्य म्हणून बुफे चांगला वाटायचा पण हल्ली ना खिशाला ना वयाला ना पोटाला तो परवडतोय!! कारण एकतर एवढे पैसे द्यायचे, पैसे दिले म्हणून नको इतके खायचे, जास्त खाल्ल्यामुळे आठवडाभर मेहनत केलेली वाया घालवायची, एक दिवस जास्त खाल्यामुळे दिवसभर अजगरासारखे लोळत पडायचे आणी त्रास सहन करायचा त्यापेक्षा नको तो Unlimited buffet!!!!!


(Unlimited buffet करता मराठी शब्द अमर्याद स्वेच्छ्या भोजन सुचवल्याबद्दल सौ वृषाली फडके यांचे आभार)

Monday, 21 October 2013

ऐकावे ते नवलच!!!

नुकताच मी एक सेमिनार attend केला, seminar होता teenager's च्या parents करता. सेमिनारमध्ये सगळ्या parents चे हे मत होते की आपल्या आईवडिलांना आपले काय होईल ही अजिबात काळजी नव्हती त्यामुळे आपल्यालाही. पण आता आपणच competition मुळे इतके pressure घेतो की त्यामुळे मुलेही stressed असतात. तेंव्हा तिथे आलेल्या डॉक्टर नी सांगितलेले मला पटले की खरतर tension तुंमच्या आईवडिलांनी घ्यायला पाहिजे होते कारण choices limited होते. पण आता kids will do something good of their life with so many career choices available.
Career  चा  decision  सगळ्यांच्या जीवनातला मोठ्ठा decision असतो. खरतर हा decision घ्यायची वेळ आयुष्यात ३-४ दा येते. वयाच्या १६, २८ ते ३० आणी ४० ते ४५ च्या दरम्यान आणी ६० व्या वर्षी सुद्धा ( हो, retirement नंतर काय हाही प्रश्न हल्ली महत्वाचा झालाय) पण तरीही १६ व्या वर्षीचा निर्णय हा सगळ्यात महत्वाचा व तो योग्य व्हावा यासाठी सगळेजण आपापल्या परीने प्रयत्न करीत असतात.
खरतर हा decision जेंव्हा स्वतःच्या बाबतीत घेतला तेंव्हा CollegesCareer choices / exposure  इतके limited होते. Engineering Medicine / Science/ Commerce / Arts / Teaching / Armed forces येवढेच. हळूहळू परिस्थिती बदलत गेली exposure वाढले आणी choices ही. Engineering  व Medicine  च्या शाखा वाढल्या /  Science चे विषय वाढले / MBA / CA Sales/ Marketing/ Finance / HR / Media/ Mass communication/ Advertising /  Architecture/ Fashion design / Graphics design / Journalism / Politics / News anchoring / Information Technology / Environment Science / Photography / Flying - Pilot / Beauty पार्लर / Spa अश्या अनेक courses नी मान्यता मिळवली. Even Bollywood started running like companies  with CEO from IIMs and with highly learned  technicians .
बहुतांशी जो कुठला कोर्स केला असेल तेच काम लोक आयुष्यभर करत असतं. आपल्या आवडी ह्या hobby म्हणून नोकरी बरोबर सांभाळल्या जायच्या पण आता तोही pattern बदलला. हल्ली काही लोकांनी hobby हेच profession केलेय.
मी ऐकलेले काही हटके courses आणी professions ........
(ह्याव्यतिरिक्त तुम्हाला courses आणी professions माहित असतील तर जरूर कळवा.)
काही हटके कोर्सेस:
  • ·         Forensic Science CID ना लागणाऱ्या technical  माहितीसाठी
  • ·         Wildlife Photography - ३ idiot नंतर प्रसिद्धीस पावलेले
  • ·         Jewellery design - सोने-चांदी- हिरे याचबरोबर हल्ली teracotta / paper/ kundan / metal wires अश्या अनोख्या jewellery ची ही मागणी वाढलीय, ते design करणारे ( पूर्वी हे वंशपरंपरेने शिकले जायचे पण आता ज्यांना आवड आहे ते करू शकतात)
  • ·         Course in Radio Jockeying and Voice Over- RJ परत एकदा रेडीओ ला चांगले दिवस आल्यामुळे
  • ·         Course in Archaeology and Ancient history
  • ·         Ornithologist - Study of birds
  • ·         Hospital management / Resort management / Event management / Social entrepreneurship - पूर्वी अशी degree नव्हती
  • ·         Image Consulting - Talent बरोबर हल्ली व्यवस्थित दिसण्यालाही खूप महत्व आलेय अशी मदत करणारे
  • ·         Course in Showroom design - हल्ली shoppers choosy झालेत त्यामुळे shoppers  ना attract करण्याकरता Mall मधले Showroom design महत्वाचे झालेय
काही हटके प्रोफेशन्स आणि करियर
(These courses are not available but people are converting there hobbies/passion into profession)
  • ·         सगळ्यात जास्त लोकांपर्यंत पोहचण्याचे TV सारखे दुसरे माध्यम नाही त्यामुळे TV Advertisement मध्ये जे अन्न, फळे, भाज्या दाखवतात त्या खऱ्या कश्या दिसतील हे पाहणारे  आणी त्याप्रमाणे तयार करणारे
  • ·         हल्ली सगळ्या पौराणिक serials चे दिवस आहेत त्याकरता खास sets, दागिने, कपडे याचे design करणारे
  • ·         हल्ली अजून एक नवीन म्हणजे reality shows - cooking, dancing,singing, comedy ह्यामध्ये कुणी काय बोलायचे ह्यासाठी लेखक
  • ·         दूरदर्शन वरील जाहिरातीकरता - writers / singers / musicians
  • ·         Personal Shoppers  हल्ली लोकांकडे पैसा असतो पण वेळ नसतो अश्या खास लोकांकरता shopping 
  • ·         Scuba diving trainers  - ज्यांना स्वीम्मिंग आवडते त्यांना हौस आणी profession दोन्ही
  • ·         Internet marketing - हल्ली Google तरुण पिढीची जीवनाचा महत्वाचा भाग झालाय अश्या इंटरनेट savvy लोकांच्या सारखे समोर राहायचे असेल तर आपली website/product नेहमी first १० searches मध्ये ठेवायचे ( हो हे profession आहे )
  • ·         Teaching Mountaineering / Trekking  त्यांना फक्त वर्षातून एकदाच २ महिन्याकरता जावे लागते
  • ·         Career Counselling - हा सगळ्यात मोठा business झालाय
  • ·         Related to Pets - pets restaurants / spas / bakeries / accessories / trainers / day care
काही काही careers वा profession ऐकून थक्क व्हायला होते आणी छान ही वाटतेय की नोकरी ही फक्त पापी पेट का सवाल न राहता मुले पैसे ही मिळवत आहेत आणी enjoy ही करत आहेत. ही professions गरज म्हणून चालू झाली असली तरी त्यातून पाहिजे ते करायला मिळायचा आनंदही मिळतोय. शेवटी अजून काय हवं असतं माणसाला!!!

Thursday, 10 October 2013

भाग्याची गोष्ट


गेल्या काही दिवसापुर्वीची गोष्ट
माझ्या कामवालीने माझ्याकडे दहाहजार रुपयाची demand केली (असे मधे-मधे छोटे-मोठे धक्के ती देतच असते. प्रत्येकवेळी कारण वेगळी असतात)
ती: दीदी १०,००० चाहिये, मेरे salary मे से काट लेना!
मी: ३ महिने पहेले लिये थे ना फिरसे क्यू चाहिए?
ती: दीदी सबने हा बोला है! मै किसीसे १०,००० और किसीसे २०,००० ले रही हू....... तुम तो २०,००० दोगी नही, इसलिये १०,००० मांग रही हुं
मी:  पर क्यू चाहिए इतने सारे पैसे?
(मनात - काय बाई आहे - माझ्या तोंडावर, माझ्याच घरात उद्धटपणा करते.......पैसे मागते कि order करतेय )
ती: दीदी, husband ने बोला है और TV पे दिखाया की सोने का भाव कम हो गया है......तो आजही सबसे पैसे लेके(एक लाख रुपये) उसका सोना लूंगी....कल भाव फिर बढेगा तो problem होगा .... सोना बाद मे काम आयेगा....मै saving नही करती ना?
मी: :(   :O    :^)    (think)  (shake)   :|
असे जेवढे emoticon शक्य असतील तेवढी expressions दिली. एकाच वेळी तिच्या समाझदारीचे/ शहाणपणाचे कौतुक करावे/ मूर्खपणाबद्दल ओरडावे/सारखे पैसे मागते म्हणून रागवावे कि सगळ्यांकडून पैसे घेऊन नंतर पगाराचे काय करणार असे अनेक विचार माझ्या मनात येऊन गेले.
जेंव्हा मी हे नवऱ्याला सांगितले तेंव्हा त्याचेही अजून एक lecture ऐकावे लागले की ती अशिक्षीत बाई येवढा मार्केट condition चा विचार करून proactively decision घेतीय आणी तू?
परत एकदा सगळे emoticons........... :(   :O    :^)    (think)  (shake)   :|
आणी माझी विचारचक्र जोरात फिरू लागली ....आजकालच्या service provider बद्दल ......worker क्लास बद्दल.....maids बद्दल.
पूर्वी आमच्या घरी जी कामवाली होती तिचे जग म्हणजे माझी आई. आई जे काही सांगेल ते ती ऐकायची. फारसे स्वतःचे डोके वापरायची नाही.नवरा दारू पितो म्हणून काम करायची वेळ आली होती तिच्यावर. माझ्या आईने तिला खूप मदत केली होती. शिक्षण अजिबात नाही त्यामुळे व्यवहार कळत नव्हता कि वागायचे कसे? माझ्या आईने तिला सगळे शिकवले. जशी आमची परिस्थिती बदलत गेली तशी तिचीही. तिच्या मुलीही आमची पुस्तके/कपडे वापरून मोठ्या झाल्या. अन्न/कपडे/वस्तू घेऊन जायला त्यांना कमीपणाचे वाटायचे नाही. ज्यांच्या घरी काम करतो ती लोक वेगळी आहेत, त्यांच्या सारखे आपले असावे हि इच्छ्याही नव्हती व महत्वकांक्षाही. असेच चित्र जवळपास सगळ्यांच्या कामवाल्यांचे होते.
पण परिस्थिती हळूहळू बदलली आणी आता फार वेगाने बदलतीय. बहुतेक मोठ्या शहरातील कामवाल्यांची पहिली पिढी थोडीफार शिकली, त्यांच्याकडे पैसा खेळू लागला. शिक्षणाबरोबर व सुविधाबरोबर त्यांची मानसिकताही बदलली. त्यांच्या इच्छ्या-आकांक्षा वाढल्या. TV घरी आल्यामुळे खूप गोष्टी कळू लागल्या. त्यांचेही मान-अपमान वाढले. आता त्यांना अन्न/कपडे/वस्तू दिलेल्या आवडत नाहीत. अगदी नवीन गोष्टी दिल्या तरी फारशी ख़ुशी नसते. कामाचा दर्जा व आपलेपणा कमी झाला पण अपेक्षा भरपूर वाढल्या. त्यानाही sunday ला सुट्टी हवी असते विश्रांतीकरता. माझी कामवाली मुलांना सुट्टीत फिरायला घेऊन जाते. मागच्या वर्षीच आमच्या सगळ्यांच्या कडून पैसे उधार घेऊन तिने गावाकडे plot घेतला.......आता सोने घेतेय. ती सकाळी ६ ते १ व ३ ते ९ अशी जवळजवळ १३-१४ तास काम करते म्हणून तिच्या मुलाला सांभाळायला व तिच्या घराचे काम करायला गावाकडून एक fulltime मुलगी घेऊन आलीय.
परत एकदा........... :(   :O    :^)    (think)  (shake)   :|
पण हे सगळे ती करतेय कारण तिला माहित आहे सगळ्या दीदी तिच्यावर इतक्या अवलंबून आहेत. दीदींच्या घराची गाडी तिच्यामुळे सुरळीत चाललीय. आजकालच्या जॉब-घर-मुले व हेक्टिक lifestyle मुळे सगळ्या दीदीही तिच्यावर अवलंबून आहेत. त्यामुळे सध्याची हि नवीन म्हण आहे
Behind every successful women there is good maid.
आणी ही good maid मिळणे ही अगदी भाग्याची गोष्ट झालीय.मागच्या जन्मी नक्की काहीतरी पुण्य केलं म्हणून चांगली कामवाली मिळाली असे म्हणायला हरकत नाही.

Monday, 7 October 2013

Quilling - Earrings

आम्ही एका पार्टी ला गेलो होतो. तिथे एका मैत्रिणीचे कानातले पाहिले. अगदी कानातील आधी घेतले मग त्याला matching dress घेतला की काय असे वाटण्याजोगे perfect matching होते. विचारल्यावर तिने सांगितले की ह्याला quilling म्हणतात आणी हे paper चे बनलेले असते. माझ्या स्वभावाप्रमाणे मी जाऊन घेऊन आले सगळे सामान आणी काही गोष्टी करून पाहिल्या. Paper च्या पट्ट्या वेगवेगळ्या size colors च्या विकत मिळतात. तुम्ही घरीही कापू शकता पण विकतच्या convenient पडतात. Sizes , Colors आणी  Shapes वेगवेगळे घेऊन अगणित combinations करता येतात. Sky is limit.
मी करून पाहिलेली काही designs...................