नवरात्र साजरे करण्यामागचे कारण मार्कंडेय पुराणामध्ये देवी
महात्म्यात सांगितले आहे. जगात तामसी व क्रूर लोकांची संख्या वाढून ते इतरांना
त्रास देऊ लागतात तेव्हा सज्जनांना त्रासमुक्त करण्यासाठी, त्यांना त्यांचे
स्थान पुन्हा मिळवून देण्यासाठी शक्तीदेवता या धरतीवर अवतीर्ण होते. आपण आपल्यातल्या वाईट गुणांना घालवायचे बळ
मिळण्याकरता नवरात्र केले पाहिजे. आपल्यातील उर्जा-शक्ती परत मिळवण्यासाठी केले
पाहिजे.
आपण रोज झोपून सकाळी उठतो तेंव्हा आपल्याला विश्रांती
झाल्यामुळे प्रसन्न वाटते. झोपल्यानंतर जशी आपली शारीरिक विश्रांती होते तशीच
मानसीकही होते.(खरतर म्हणून आपल्याला जास्त fresh वाटते.) नवरात्रीचा उद्देश्य हाच आहे की आपण बहिर्मुखता
टाकून अंतर्मुख व्हावे. वर्षातील हा असा काळ आहे जेंव्हा आपण स्वतःसाठी (
आध्यात्मिक उन्नतीकरता) मेहनत करायची आहे. शारीरिक, वाचिक व मानसिक शुद्धीसाठी उपास, मौन आणि ध्यान
करायचे आहे. जेणेकरून आपली अंतर्बाह्य शुद्धी होईल आणि आपण प्रसन्न ( rejuvenate) होऊन वर्षभराकरता परत तयार होऊ.
देवीनी साऱ्या असुरांशी युद्ध केले तसेच आपण आळस, गर्व, आसक्ती, लाज, अहंकार,
मत्सर, क्रोध ह्या आपल्या आत असणाऱ्या असुरांशी लढायचे आहे. त्याकरता अंतर्बाह्य
शुद्धीची आवश्यकता आहे. बाह्य विश्वात तर आपण सारखेच बुडलेले असतो पण ही आपल्या आत
बुडण्याची संधी आपल्याला हा उत्सव देतो. वातावरणामध्येही खूप बदल होत असतात(
हिवाळ्याची सुरुवात ) त्या बदलानाही सामोरे जाण्यासाठी सात्विक अन्न खाण्याची गरज
असते. शरीराला सुंदर बनवण्यासाठी पार्लर किंवा स्पा मध्ये जातात. जर शरीराला इतक्या
maintenance ची गरज आहे तर मनाला कितीतरी पटीने जास्त गरज आहे. त्यामुळे
मनाला सुंदर बनवण्यासाठी शास्त्रामध्ये मौन, जपसाधना आणि ध्यान सांगितले आहे जे ह्या
काळात करतात. थोडक्यात हा जरी उत्सव असला तरी वेगवेगळ्या मार्गांनी उर्जा-शक्ती
मिळवण्याचा काळ (period) आहे.
दिवस दुसरा:
रूप: या दुर्गेच्या उजव्या हातात जपमाळ आणि डाव्या हाता कमंडलू
आहे
देवीचे तत्व: आकाश
रंग : निळा
तत्वाशी संबधित आकार: १ पाकळी
साधना: मन 'स्वाधिष्ठान' चक्रात स्थिर
करतात
मंत्र :
दधाना करपदमाभ्यामक्षमालाकमंडलू।
देवी प्रसिदतु मयि ब्रम्हाचारिण्यनुमत्तमा।।
नऊ दिवसाचे नऊ गोल
आजचा रंग: निळा || गोल: दुसरा || आकार: १ पाकळी
No comments:
Post a Comment