कालच आपण पाहिले 'स्व' चा शोध घेणे हेच मानवी जीवनाचे आद्यकर्तव्य आहे. आध्यात्मिक उन्नती काय किंवा भौतिक उन्नती काय, अगदी सगळ्याच क्षेत्रात , स्पोर्ट्समध्ये सुद्धा मनोनिग्रह (mind control ) हा महत्वाचा आहे. Stronger body and calmer mind ह्याला सगळीकडेच महत्व आहे पण आपले अगदी उलटे असते. मनामध्ये सतत विचार चालू असतात. मनाचे माकड अगदी धुमाकूळ घालत असते. Past, Present and Future असे सारखे विचार चालू असतात. मग प्रश्न पडेल की मन म्हणजे नक्की काय? मन शांत होणे शक्य आहे का? ते शांत कसे करायचे?
पूर्वी आपल्या सगळ्यांच्या घरी कंदील असायचे. (नवीन पिढीला माहित नसतील म्हणून मुद्दाम फोटो टाकलाय.) तो कंदील वर्षानुवर्षे वापरला जायचा. त्यामुळे नियमित साफसफाई लागायची. विचार करा की जर कंदील आपण नुसता वापरला पण त्याची साफसफाई केली नाही तर नक्कीच धुळीचे थर चढत जातील. मग आपण एक दिवस ज्योत पेटवली तरी प्रकाश बाहेर येणार नाही. मग आपण असे म्हणू शकू का की ज्याअर्थी प्रकाश बाहेर येत नाही त्याअर्थी आत ज्योत नाही?
मग काय केले पाहिजे?
तर त्या काचेवरची धूळ साफ केली पाहिजे . जेंव्हा ती साफ होईल तेंव्हा ज्योत आतच असल्यामुळे लखकन प्रकाश येईल.
आता हेच logic आपल्या स्वतःला लावूया -
कंदील म्हणजे आपला देह आहे. आतली ज्योत म्हणजे चैतन्य आहे आणि काच म्हणजे आपले अंतःकरण. चैतन्य तर आहेच पण अंतःकरण इतके मलीन (दोष) झाले आहे की त्यामुळे चैतन्याचा प्रकाश दिसत नाही. त्यामुळे सगळी मेहनत काच साफ करायला म्हणजे अंतःकरण शुद्धी करण्याकरता करायची आहे.
अंतःकरण म्हणजे काय?
मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार ह्या सगळ्या समूहाला मिळून अंतःकरण म्हणतात. हे सूक्ष्म आहे म्हणजे दाखवता येत नाही पण अनुभवता येते. हा कुठला अवयव नाही पण आपण ज्या क्रिया करतो त्या प्रत्येकामध्ये ह्याचा सहभाग असतो. आपण एका उदाहरणावरून समजावून घेऊया.
आपण बाहेर फिरायला गेलोय. वाटेत आंब्याचे झाड दिसले. मस्त पिवळाधमक आंबा पहिला आणि खायची मनीषा झाली.
१. आंबा खायचा आहे/ तोडू का?/ कुणी पहिले तर? / पहिले तर काय म्हणतील? पण मला पाहिजेच वगैरे -- मन - संकल्प-विकल्प
२. हे झाड कुणाचे आहे? / असा आंबा तोडणे योग्य आहे का? नाही चोरणे बरोबर नाही -- बुद्धी - निर्णय
३. आंबा कसा बरे पडता येईल? / काठीने की दगडाने? कधी बर पडला होता आधी?---चित्त - चिंतन आणि स्मृती
४. आंबा पाहिजे आणि तो दगडांनी पाडायचा ------ अहंकार - इंद्रियांना सूचना
सर्वसाधारणपणे हे चक्र प्रत्येक गोष्टीसाठी अव्याहत चालू असते. बाहेर घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीचा परिणाम अंतःकरणावर होत असतो. ( जन्मानुजन्मे) ह्यावरून आपल्याला अंदाज येईल की मनाचा रोल किती महत्वाचा आहे. Mind control किंवा मनोनिग्रह हा प्रत्येक क्षेत्रात का महत्वाचा आहे? आध्यात्मिक उन्नतीकरता तर प्रचंड महत्वाचा आहे. अंतःकरण शुद्धी म्हणजे मनाचीच शुद्धी करायची आहे. म्हणजे मनाचे जे दोष आहेत ते कमी करण्याकरता मेहनत करायची आहे. मनाचे दोष हे आहेत -- Unstable mind, Reacting mind आणि Conflicting mind.
१. मनाचा भरकटणे हा जसा स्वभाव तसाच गुंतणे हा देखील. त्यामुळे मनाला जास्तीतजास्त चांगल्या गोष्टीत गुंतवायचे.
२. " आगते स्वागतम कुर्यात " प्रत्येक प्रसंग जसा असेल तसा accept करायचा
३. भूतकाळ आणि भविष्यकाळात न रमता फक्त वर्तमानाचा विचार करायचा. Encash every moment. प्रत्येक कामात १००% लक्ष्य द्यायचे.
वर सांगितलेल्या कुठल्याच गोष्टी सोप्या नाहीत. पण रोज थोडेतरी तसे वागलो तर नक्कीच एक दिवस मनोनिग्रह शक्य आहे. आपण शरीर सुदृढ होण्यासाठी जितके कष्ट घेतो त्यापेक्षा मन सुदृढ होण्यासाठी घेऊया म्हणजे जीवन सुंदर नक्की होईल.
खरेतर हा विषय इतका मोठा आहे की एका लेखात सांगणे शक्य नाही पण विचाराला चालना मिळावी हा हेतू आहे.
महागौरी आपल्या सगळ्यांना तशी बुद्धी देवो ही प्रार्थना.
दिवस आठवा:
आठवी आदिशक्ती: ' महागौरी'
रूप: या देवीचा रंग पूर्णत: गोरा आहे. या गोर्यापराची
उपमा शंख, चंद्र आणि
कुंदाच्या फुलापासून दिली आहे. या देवीचे वय आठ वर्ष मानले जाते, 'अष्टवर्षा भवेद्
गौरी।' तीचे वस्त्र आणि
आभूषणदेखील श्वेत रंगाची आहेत. तिच्या वरील उजव्या
हातात अभयमुद्रा आणि खालील उजव्या हातात त्रिशूळ आहे. वरच्या हातात डमरू
आणि वर-मुद्रा आहे.
देवी: श्री महागौरी
देवीचे वाहन: वृषभ
आजचा रंग: गुलाबी
मंत्र :
श्वेते
वृषे समारूढा श्वेताम्बरधरा शुचि:।
महगौरी शुभं दान्महादेवप्रमोददा।।
महगौरी शुभं दान्महादेवप्रमोददा।।
आजचे गुलाबी मंडल
No comments:
Post a Comment