देवी तत्व
आपण जेंव्हा आजूबाजूला सृष्टी पाहतो - मनुष्य, प्राणी, पक्षी,
वनस्पती, ग्रह, तारे, इत्यादी. तेंव्हा आपल्या मनात नक्कीच विचार येतात की हे सर्व
कसे झाले असेल? कशापासून तयार झाले असेल? कोणी बनवली असेल? वगैरे. ह्याला
शास्त्रामध्ये ' कार्यकारण सिद्धांत ' असे म्हणतात- " कारणम विना कार्य न सिद्धती|
"
आता एक घटाचे उदाहरण घेऊया
१. घट(कार्य) हा मातीपासून(कारण) बनलेला असतो. मातीशिवाय तो
बनूच शकत नाही. पण माती स्वतः त्याला बनवू शकत नाही.
२. त्यासाठी कोणीतरी skilled person(कर्ता) लागतोच.
३. घट तयार (उत्पत्ती) होतो, वापरात(स्थिती) येतो आणि नंतर
फुटतो(लय) पावतो. म्हणजे घट हा आधी माती होता आणि फुटल्यावर मातीच होणार. म्हणजे
माती(कारण) हेच तिन्ही काळात सत्य आहे.
४. जे मातीचे गुणधर्म आहेत तेच घटात असणार. घटाचे वेगवेगळे
आकार व त्याप्रमाणे नावे असतात, जसे रांजण, माठ, घट इत्यादी.
जर घटासारख्या अचेतन गोष्टीलाही कारण आणि कर्ता आहे तर
मनुष्य, प्राणी, वनस्पती, निसर्ग, ग्रह, तारे ह्या सर्व सृष्टीला सुद्धा कारण आणि
कर्ता असायलाच पाहिजे.
हेच logic जर आपण सृष्टीला लावले तर
१. सर्व सृष्टी -मनुष्य, प्राणी, वनस्पती, निसर्ग, ग्रह,
तारे(कार्य) हे पंचमहाभूते आणि त्रिगुण (कारण) यापासून बनलेले आहे.
२. हे सर्व जिचे कार्य आहे ती प्रकृती - देवी (कर्ता) असली
पाहिजे.
३. सृष्टीतील सर्वाना उत्पत्ती, स्थिती, लय आहे.
४. जे प्रकृतीमध्ये आहे तेच सर्व सृष्टीमध्ये आहे.
दिवस सहावा:
सहावी आदिशक्ती: 'कात्यायनी' (प्रसिद्ध महर्षी
कात्यायनानी भगवतीची कठोर तपस्या केली.भगवतीने त्यांच्या घरी जन्म
घ्यावा अशी त्यांची इच्छा होती. भगवतीने त्यांच्या या प्रार्थनेचा स्वीकार केला.)
रूप: चारभुजाधारी- देवीचा उजव्या
बाजूकडील वरचा हातात अभयमुद्रा आणि खालच्या हातात वरमुद्रा आहे. डावीकडील वरच्या
हातात तलवार आणि खालच्या हातात कमळाचे फूल आहे.
देवी: श्री लक्ष्मी
देवीचे वाहन: सिंह
रंग : केशरी
तत्वाशी संबधित आकार: फुलाची पाकळी
साधना: मन 'आज्ञा' चक्रात स्थिर करतात
मंत्र : ओंकार जपसाधना
नऊ दिवसाचे
नऊ गोल
आजचा रंग: केशरी || गोल: सहावा || आकार: फुलाची पाकळी
No comments:
Post a Comment